Asia suez canal blocked : स्वेज कॅनलमध्ये अडकलं विशालकाय जहाज; दर तासाला होतंय 2800 कोटींचं नुकसान, पाहा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 03:52 PM2021-03-25T15:52:34+5:302021-03-25T16:01:27+5:30
Asia suez canal blocked : हे जहाज अडकल्यामुळे जगभरात अनेक गरजेच्या वस्तू आणि किमतींमध्ये बदल होऊ शकतो. या कंटेनर जहाजाच्या भव्यतेचा अंदाजही लावला जाऊ शकत नाही.
इजिप्तमधील मिस्त्रच्या स्वेज नाल्यात मंगळवारी एक विशालकाय कार्गो कंटेनर जहाज अडकल्यामुळे मोठ्या प्रमाणात कोंडी झाली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे जहाज लवकरात लवकर बाहेर काढलं नाही तर रस्त्यात मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो. भूमध्य समुद्र आणि लाल समुद्राला जोडत असलेल्या स्वेज कॅनलमुळे आशियातून युरोपात जाणं सोपं होतं. यामुळे पूर्ण बेटाला फेरी मारावी लागत नाही. हे जहाज कंटेनर अडकल्यामुळे शेकडो कोटी रुपयांचे नुकसान होत आहे.
एमवी गिवन नावाच्या या जहाजावर अमेरिकी देश पनामाचा झेंडाही आहे. हे जहाज आशिया आणि युरोपात व्यापारासाठी वापरलं जातं. हे जहाज अडकल्यामुळे जगभरात अनेक गरजेच्या वस्तू आणि किमतींमध्ये बदल होऊ शकतो. या कंटेनर जहाजाच्या भव्यतेचा अंदाजही लावला जाऊ शकत नाही. जे जहाज जवळपास ४०० मीटर लांब असून २ लाख टन मिट्रिक टन वजन आहे. हे जहाज काढताना एक्सकॅवेटर लावण्यात आलं होतं. या जहाजाचे संचालन एव्हरग्रीन मरिन कॉर्प्स नावाच्या तायवानची एक शिपिंग कंपनी करते. तिच्यासाठी 'त्याने' चक्क कापल्या हाताच्या नसा! तरुणाची विवाहित महिलेवर जबरदस्ती
🌇 #مشاريع_مصر🇪🇬|
— مشاريع مصر Egypt (@EgyProjects) March 24, 2021
The Chairman of the Suez Canal Authority, follows up the rescue work and the floatation procedures of the giant container ship EVER GIVEN.
The authority has reopened the canal's older channel to divert some traffic until the grounded ship can move again. pic.twitter.com/KNx0y1McKV
प्रत्येक तासाला ४० कोटी डॉलरचं होतंय नुकसान
मंगळवारी या परिसरात वेगानं हवा वाहत होती. त्यामुळे कॅनलच्या आजूबाजूची रेतीसुद्धा उडत होती. असं मानलं जातं की, विजिबिलिटी कमी झाल्यामुळे जहाज स्वेज कॅनलच्या किनारी जाऊन फसलं. यामुळे जवळपास संपूर्ण कॅनल ब्लॉक झालं. या विशालकाय जहाजाला बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत. जेणेकरून जास्त नुकसानाचा सामना कराव लागणार नाही. भारीच! लॉटरी एजंट महिलेचा प्रमाणिकपणा; तिकिटाचे २०० रूपये देताच पठ्या जिंकला ६ कोटींचा जॅकपॉट