आशियाई बाजारात तेलाचे भाव घसरले
By Admin | Published: August 18, 2015 10:05 PM2015-08-18T22:05:08+5:302015-08-18T22:05:08+5:30
चीनमध्ये कमी झालेली मागणी आणि त्याचवेळी मजबूत झालेल्या डॉलरमुळे आशियाच्या बाजारात मंगळवारी तेलाचे भाव आणखी खाली आले
सिंगापूर : चीनमध्ये कमी झालेली मागणी आणि त्याचवेळी मजबूत झालेल्या डॉलरमुळे आशियाच्या बाजारात मंगळवारी तेलाचे भाव आणखी खाली आले.
वेस्ट टेक्सास इंटरमिजिएटचे सप्टेंबरच्या डिलिव्हरीचे तेल बॅरलमागे ७ सेंटस्ने खाली येऊन ४१.८० अमेरिकन डॉलर झाले, तर बे्रंटचे आॅक्टोबरच्या डिलिव्हरीसाठीचे कच्चे तेल १३ सेंटस्ने स्वस्त होऊन ४८.६१ अमेरिकन डॉलर झाले. वेस्ट टेक्सासचे तेल गेल्या दोन महिन्यांत ३० सेंटस्ने स्वस्त झाले. या तेलाची किंमत मार्च २००९ नंतरची सगळ्यात कमी आहे. तेलाची चीनमधून कमी झालेली मागणी आणि अमेरिकेत होणारा मोठ्या प्रमाणातील त्याचा पुरवठा यामुळे गेल्या महिन्यात तेलाच्या किमती खाली आल्या, असे कॅपिटल इकॉनॉमिक्स या संशोधन संस्थेने म्हटले. तेलाचा अतिरिक्त पुरवठा २०१८ पर्यंत कायम राहील, अशी अपेक्षा फिचने व्यक्त केली.