भारतासोबतची संवाद प्रक्रिया उधळू देणार नाही- असिफ

By admin | Published: January 10, 2016 01:59 AM2016-01-10T01:59:30+5:302016-01-10T01:59:30+5:30

भारतासोबतची संवाद प्रक्रिया कोणत्याही दहशतवादी गटाला विस्कळीत करू दिली जाणार नाही, असे पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वॉजा मुहम्मद असिफ यांनी म्हटले. दहशतवादी कारवायांमध्ये

Asif will not interfere with dialogue with India | भारतासोबतची संवाद प्रक्रिया उधळू देणार नाही- असिफ

भारतासोबतची संवाद प्रक्रिया उधळू देणार नाही- असिफ

Next

इस्लामाबाद : भारतासोबतची संवाद प्रक्रिया कोणत्याही दहशतवादी गटाला विस्कळीत करू दिली जाणार नाही, असे पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वॉजा मुहम्मद असिफ यांनी म्हटले. दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई केली जात आहे, असे असिफ वृत्त वाहिनीशी बोलताना म्हणाले.
दहशतवादी हे मानवतेचे शत्रू आहेत त्यामुळे कोणत्याही स्वरूपाच्या दहशतवादाचा पाकने निषेधच केला असल्याचे असिफ म्हणाले. पाक-भारत यांच्यातील शांतता बोलणी उधळून लावण्याची काहींंची इच्छा असली तरी ते या दुष्ट कारवायांत यशस्वी होणार नाहीत, असे असिफ यापूर्वी म्हणाले होते. दहशतवाद नष्ट करण्यासाठी आम्ही राबविलेल्या व सध्याही सुरू असलेल्या ‘झर्ब- ए- अब्ज’ कारवाईद्वारे मोठे यश मिळविल्याचे असिफ म्हणाले. दहशतवादाविरुद्ध लढताना मुलकी सरकार आणि लष्कर यांच्यात मतभेद नाहीत, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Asif will not interfere with dialogue with India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.