धर्म विचारून गोळ्या घातल्या

By admin | Published: April 5, 2015 02:11 AM2015-04-05T02:11:58+5:302015-04-05T02:11:58+5:30

केनियातील गॅरिसा विद्यापीठावरील हल्ल्याने मानवता सुन्न झाली. अल-शबाबच्या दहशतवाद्यांनी घडविलेल्या या नरसंहाराने अवघे जग हादरले.

Asking religion and throwing bullets | धर्म विचारून गोळ्या घातल्या

धर्म विचारून गोळ्या घातल्या

Next

नैरोबी (केनिया)- केनियातील गॅरिसा विद्यापीठावरील हल्ल्याने मानवता सुन्न झाली. अल-शबाबच्या दहशतवाद्यांनी घडविलेल्या या नरसंहाराने अवघे जग हादरले. अमानुषपणा आणि क्रौर्याची सीमा लांघत अल-शबाबच्या दहशतवाद्यांनी धर्म विचारून बेछूटपणे गोळ्या घातल्या, असे या हल्ल्यातून सुदैवाने बचावलेल्या काही विद्यार्थ्यांनी सांगितले.
धर्मग्रंथ वाचण्यास सांगून केली खातरजमा
अब्दुल रहमान गुरुवारी उष:काली आलेल्या काळरात्रीचा साक्षीदार आहे. दहशतवाद्यांनी आम्हाला दरडावून पालथे पडण्यास सांगितले. माझ्याजवळ आलेल्या दहशतवाद्याने मला धर्म विचारला. मी मुस्लिम असल्याचे सांगितल्यानंतर त्याने मला धर्मग्रंथ वाचण्यास सांगून खातरजमा केली व दुसऱ्या विद्यार्थ्यांकडे मोर्चा वळविला. त्यांनाही धर्माबाबत विचारणा केली. ज्यांना धर्मग्रंथ वाचता आला नाही, त्यांना दहशतवाद्यांनी निर्दयीपणे गोळ्या घातल्या.

Web Title: Asking religion and throwing bullets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.