१७०० किमी प्रवास करणा-या आसामच्या हत्तीचा बांगलादेशात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2016 01:52 PM2016-08-16T13:52:58+5:302016-08-16T13:52:58+5:30

आसाममधल्या पूरामुळे कळपापासून ताटातूट होऊन बांगलादेशात पोहोचलेल्या हत्तीचा अखेर मंगळवारी सकाळी मृत्यू झाला.

Assam elephant traveling 1700 km to death in Bangladesh | १७०० किमी प्रवास करणा-या आसामच्या हत्तीचा बांगलादेशात मृत्यू

१७०० किमी प्रवास करणा-या आसामच्या हत्तीचा बांगलादेशात मृत्यू

Next

ऑनलाइन लोकमत 

ढाका, दि. १६ - आसाममधल्या पूरामुळे कळपापासून ताटातूट होऊन बांगलादेशात पोहोचलेल्या हत्तीचा अखेर मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. जवळपास १७०० किमीचा प्रवास करुन हा हत्ती बांगलादेशमध्ये पोहोचला होता. या हत्तीला वाचवण्याचे अखेरप्रयत्न केले पण हजारो किमीच्या प्रवासामुळे हा हत्ती थकला होता, दुर्बल झाला होता. 
 
बांगलादेशमधल्या सफारी पार्कमध्ये हलवण्यासाठी या हत्तीला तीनवेळा बेशुध्दीचे इंजेक्शन देण्यात आले. जून महिन्यात आसाममध्ये आलेल्या पूरानंतर हा हत्ती बांगलादेशमध्ये आला होता. आज सकाळी सातवाजता या हत्तीने अखेरचा श्वास घेतला. 
 
मागच्या आठवडयात या हत्तीला बेशुध्दीचे इंजेक्शन देताना हा हत्ती तळयात पडला. स्थानिकांनी पाण्यात उतरुन या हत्तीला बुडण्यापासून वाचवले. जवळपास चार टन या हत्तीचे वजन होते. जास्त प्रमाणात बेशुध्दीची औषधे दिल्यामुळे या हत्तीचा मृत्यू झाला असा दावा स्थानिक प्रसारमाध्यमांनी केला आहे. 
 
मागच्या काही दिवसात या हत्तीला स्वत:च्या पायावरही उभे रहाता येत नव्हते. मोठया प्रवासामुळे या हत्तीचा मृत्यू झाला असा बांगलादेशच्या वनअधिका-यांचा दावा आहे. 
 

Web Title: Assam elephant traveling 1700 km to death in Bangladesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.