असांज इक्वाडोरचा दूतावास सोडणार
By admin | Published: August 19, 2014 01:26 AM2014-08-19T01:26:10+5:302014-08-19T01:26:10+5:30
लंडनमधील इक्वाडोर दूतावास आपण लवकरच सोडणार असल्याचे विकिलिक्सचे संस्थापक ज्युलियन असांज यांनी सोमवारी येथे सांगितले.
Next
लंडन : लंडनमधील इक्वाडोर दूतावास आपण लवकरच सोडणार असल्याचे विकिलिक्सचे संस्थापक ज्युलियन असांज यांनी सोमवारी येथे सांगितले. असांज यांनी गेल्या दोन वर्षापासून या दूतावासामध्ये आश्रय घेतलेला आहे.
असांज यांना प्राणघातक आजाराने ग्रासल्याचे आणि त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल होण्याची गरज असल्याचे वृत्त झळकल्याच्या पाश्र्वभूमीवर त्यांनी दूतावास सोडणार असल्याचे म्हटले आहे. असांज यांना हृदय व फुफ्फुसाचा विकार आहे.
ऑस्ट्रेलियन नागरिक असांज यांनी ते दूतावास कधी सोडणार हे मात्र स्पष्ट केले नाही. मध्य लंडनमधील नाईट्सब्रीज येथे असलेल्या या दूतावासात इक्वाडोरचे परराष्ट्रमंत्री रिकाडरे पेटिना यांच्या सोबत पत्रकारांशी बोलताना त्यांनी ते दूतावास सोडणार असल्याचे सांगितले.
अमेरिकेची अनेक गोपनीय कागदपत्रे फोडणा:या असांज यांनी प्रचंड अनिश्चितता आणि कायदेशीर संरक्षणाच्या उणिवेत दोन वर्षे काढली आहेत. ही स्थिती निश्चितपणो संपुष्टात यायला हवी. असे पेटिनो म्हणाले. पेटिनो परिस्थितीवर तोडगा काढण्याच्या पद्धतीवर चर्चा करण्यासाठी आगामी काळात ब्रिटिश परराष्ट्रमंत्री फिलिप हामोंड यांची भेट घेणार आहेत. (वृत्तसंस्था)
4अमेरिकेची गोपनीय लष्करी कागदपत्रे फोडल्यानंतर लैंगिक छळ प्रकरणी प्रत्यार्पणासाठी त्यांना लंडनमध्ये अटक करण्यात येणार होती. मात्र, अटकेपूर्वीच असांज यांनी पळून इक्वाडोरच्या दूतावासामध्ये आश्रय घेतला होता. तेव्हापासून ते दूतावासात बंद असून बाहेर पोलिसांचा पहारा आहे.