NASA News: पृथ्वीवर लघुग्रह आदळण्याची शक्यता १० पटीनं वाढली, ऑक्सिजन होऊ शकतो नष्ट; वैज्ञानिकांच्या दाव्यानं खळबळ!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2021 02:40 PM2021-07-11T14:40:43+5:302021-07-11T14:41:22+5:30
तब्बल १५० किमी रुंदीच्या या लघुग्रहाच्या आदळण्यामुळे मेस्किकोच्या खाडीजवळ जवळपास १० किमी लांबीचा खड्डा तयार झाला होता.
पृथ्वीवर मानवाच्या उत्पत्तीपूर्वी अनेक लघुग्रह आदळल्याची उदाहरणं आहेत. त्यातील एका भल्यामोठ्या Chicxulub लघुग्रहाच्या आदळण्यामुळे आजपासून तब्बल ६ कोटी ४० लाख वर्षांपूर्वी पृथ्वीवरुन डायनासोरचं अस्तित्व संपुष्टात आलं होतं याची आपल्याला कल्पना आहे. तब्बल १५० किमी रुंदीच्या या लघुग्रहाच्या आदळण्यामुळे मेस्किकोच्या खाडीजवळ जवळपास १० किमी लांबीचा खड्डा तयार झाला होता. यात काही लघुग्रह असेही आहेत की ज्यांच्यामुळे पृथ्वीभोवती आणि वातावरणाला त्यांचं अस्तित्व प्राप्त झालं आहे. (Asteroid Earth Collision Possibility Now 10 Times More Often Than Previously Thought, Scientists Warns)
पृथ्वीवर लघुग्रह आदळण्याच्या घटना नेमक्या किती वेळा घडल्या आहेत हे सांगणं कठीण आहे. पण आता एक लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याची शक्यता १० पटींनी वाढली आहे. साऊथवेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूटच्या संशोधकांच्या म्हणण्यानुसार एका ठराविक कालावधीनंतर Chicxulub या लघुग्रहासारखाच एक लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याची शक्यता आता १० पटींनी वाढली आहे.
संशोधकांच्या माहितीनुसार, पृथ्वीवर पुन्हा एकदा एखादा लघुग्रह आदळला तर यामुळे फक्त नुकसान नव्हे, तर वातावरणातील ऑक्सिजनचं प्रमाणही खूप मोठ्या प्रमाणात कमी होईल. त्यामुळे मानव जातीचं जगणं कठीण होऊ शकतं. दरम्यान, येत्या १०० वर्षांत पृथ्वीवर कोणताही लघुग्रह आदळण्याची शक्यता नाही, असंही संशोधकांनी म्हटलं आहे.
एखादा लघुग्रह पृथ्वीच्या वातावरणात दाखल होताच त्याचं तापमान वाढतं आणि त्याचे तुकडे होण्यास सुरुवात होते. त्यानंतर कधीकधी ते उल्कापिंड स्वरुपात पृथ्वीवर येऊन आदळतात. पण मोठ्या आकाराच्या उल्केमुळे पृथ्वीवर मोठं नुकसान होऊ शकतं. छोट्याछोट्या तुकड्यांमुळे इतकं नुकसान होत नाही. त्यातही बहुतांश उल्का समुद्रात कोसळतात. कारण पृथ्वीवर जमिनीपेक्षा पाण्याचं प्रमाण अधिक आहे.