AstraZeneca Corona Vaccine: फ्रान्स, जर्मनीसह डझनावर देशांनी अॅस्ट्राझिनेकाच्या कोरोना लसीचे लसीकरण थांबविले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 07:46 AM2021-03-16T07:46:23+5:302021-03-16T07:53:43+5:30
AstraZeneca Corona Vaccination halted: कोरोना महामारीला रोखण्यासाठी अनेक देश ब्रिटनची मोठी कंपनी अॅस्ट्राझिनेका आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या लसीचा आपत्कालीन वापर करत आहेत. भारतातही पुण्याची सीरम इन्स्टिट्यूट ऑक्सफर्ड- अॅस्ट्राझिनेकाने विकसित केलेली कोरोना लस बनविते. भारतातही य़ा लसीचे लसीकरण मोठ्याप्रमाणावर सुरु आहे.
गेल्या आठवडाभरापासून युरोपमधील जवळपास डझनावर देशांनी ऑक्सफर्ड- अॅस्ट्राझिनेकाच्या (AstraZeneca Corona Vaccination) कोरोना लसीचे लसीकरण थांबवले आहे. यामध्ये फ्रान्स, जर्मनी, स्पेन आणि इटलीसारख्या देशांचा समावेश आहे. कारण डेन्मार्क, नॉर्वेमध्ये ही लस घेतल्यानंतर काही लोकांच्या धमन्यांमध्ये रक्ताच्या गाठी (blood clots) झाल्या आहेत. यामुळे काहींचे मृत्यूही झाले आहेत. अद्याप लसीमुळे असे होत असल्याचे समोर आलेले नसले तरीही या देशांनी लसीकरण थांबविण्याचा निर्णय घेतल्याने खळबळ उडाली आहे. (France, Spain. Germany suspends use of AstraZeneca vaccine)
युरोपच्या देशांसह आफ्रिकेच्या कांगो, आशियातील थायलंड या देशांनीदेखील ही लस रद्द केली आहे. तसेच ब्राझीलने फायझर कंपनीचे 10 कोटी डोस मागविले आहेत. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी सोमवारी अॅस्ट्राझिनेकाची लस देणे थांबवत असल्याचे घोषणा केली. युरोपीय मेडिसीन एजन्सी जोपर्यंत ही लस सुरक्षित असल्याचे सांगत नाही तोपर्यंत लसीकरण थांबविण्यात येत असल्याचे ते म्हणाले.
कोरोना महामारीला रोखण्यासाठी अनेक देश ब्रिटनची मोठी कंपनी अॅस्ट्राझिनेका आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या लसीचा आपत्कालीन वापर (AstraZeneca Corona Vaccination ) करत आहेत. भारतातही पुण्याची सीरम इन्स्टिट्यूट ऑक्सफर्ड- अॅस्ट्राझिनेकाने विकसित केलेली कोरोना लस बनविते. भारतातही य़ा लसीचे लसीकरण मोठ्याप्रमाणावर सुरु आहे.
डेन्मार्क, इटली आणि नॉर्वेसह सहा देशांमधील काही नागरिकांच्या धमन्यांमध्ये रक्ताच्या गाठी बनू लागल्याचे समोर आले आहे. यामुळे या देशांनी हा प्रकार गंभीरतेने घेतला असून या लसीच्या परिणामांवर चौकशी सुरु केली आहे. युरोपियन मेडिसिन एजन्सीने सध्यातरी याबाबत कोणतेही संकेत सापडलेले नाहीत. अॅस्ट्राझिनेकाची लस घेतल्यानंतर अशा प्रकारची हालत होत असल्याचे स्पष्ट झालेले नाहीय, असे म्हटले आहे.
डेन्मार्कच्या हेल्थ अथॉरिटीने सांगितले की, हे अद्याप स्पष्ट झालेले नाहीय. लस घेतल्यानंतर रक्ताच्या गाठी तयार होत असल्याचा तपास सुरु आहे. याआधी ऑस्ट्रियामध्ये 49 वर्षांच्या नर्सचा कोरोना लस घेतल्यानंतर मृत्यू झाल्याने या देशाने अॅस्ट्राझिनेकाची लस वापरणे बंद केले आहे. या नर्सचा मृत्यू तिच्या रक्तात गाठी तयार झाल्याने झाला होता.
17 हून अधिक देशांना पुरवठा
चार आणखी युरोपिय देश एस्टोनिया, लातविया, लिथुआनिया व लक्जमबर्ग या देशांनीही कोरोना लसीकरण थांबविले आहे. 17 युरोपीय देशांपैकी 10 देशांना कोरोना लसीचा डोस पाठविण्यात आला आहे. डेन्मार्कच्या हेल्थ अथॉरिटीचे संचालक सोरेन ब्रोसट्रॉम यांनी सांगितले की, आम्ही अॅस्ट्राझिनेकाची लस वापरण्यास नकार दिला नसून तात्पुरत्या स्वरुपात वापर थांबविला आहे. आमच्याकडे लस घेतल्यानंतर एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.