अंतराळवीर बराच काळ युवा राहतात?; जुळ्या भावंडांवरील स्टडीने वैज्ञानिक हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 08:42 PM2023-08-24T20:42:31+5:302023-08-24T21:01:58+5:30
२०१५ मध्ये स्कॉट कॅलीला स्पेस मिशनला पाठवणे हा या स्टडीचा भाग होता. तर त्यातील एक भाऊ पृथ्वीवर थांबला होता.
नवी दिल्ली – इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये रोजच्या जीवनात प्रचंड वेगाने बदल होतो. मुंबई असो वा न्यूयॉर्क याहून वेगवान आयुष्य असते. अंतराळवीर प्रत्येक तासाला १७ हजार किमी अंतर कापतात. रोज १६ वेळा सूर्योदय-सूर्योस्त पाहावा लागतो. एका देशाहून दुसऱ्या देशात लांबचा प्रवास करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या दिर्घ प्रवासात अंतराळवीरांच्या शरीराला काय काय भोगावे लागते यावर नासा बऱ्याच काळापासून अभ्यास करतंय.
जुळ्या भावंडावर केस स्टडी
२०१५ मध्ये स्कॉट कॅलीला स्पेस मिशनला पाठवणे हा या स्टडीचा भाग होता. तर त्यातील एक भाऊ पृथ्वीवर थांबला होता. ट्विन स्टडीवर १२ विद्यापीठे आणि ८४ संशोधक काम करत होते. कॅलीच्या स्पेस जाण्याच्या काही महिन्यांपूर्वी ब्लड, यूरिन, स्टूल सँपल घेतले गेले. प्रत्येक नमुन्याची चाचणी केली. जेणेकरून दोघांची बायोलॉजिकल वय किती एकसारखे आहे हे कळू शकेल. याला ट्विन स्टडी नाव दिले गेले. जो सायन्स जर्नलमध्ये २०१९ ला छापण्यात आला होता.
DNA मध्ये झाला बदल
जसे स्कॉट अंतराळात पोहचले त्यांच्या शरीरातील १ हजार जीन्समध्ये बदल झाला. सर्वात मोठा बदल टेलोमेअरमध्ये दिसला. हे नसांमध्ये असलेले एक प्रकारचे प्रोटीन असते. जसंजसं डीएनए छोटा होत जातो. पेशींमध्ये वृद्धत्व दिसू लागते. टेलोमेअरच्या या कमतरतेमुळे व्यक्ती वृद्ध दिसते. त्याच वेळी, अंतराळात असे आढळून आले की डीएनएचा आकार मोठा होत आहे.
वृद्धत्वाची सुरुवात टेलोमेअर कमी होण्यापासून होते
वर्षभराच्या अंतराळ प्रवासाच्या दुसऱ्या टप्प्यात ही प्रक्रिया अधिक वेगवान झाली. म्हणजेच डीएनएच्या भौतिक रचनेत थेट बदल झाला, जो पृथ्वीवर शक्य नाही. हे पृथ्वीवर असलेल्या त्यांच्या वयाच्या लोकांपेक्षा कितीतरी पटीने युवा दिसू लागले. अंतराळातील अत्यंत वातावरणामुळे टेलोमेअर लहान होऊन वय कमी होईल असं पूर्वी असे मानले जात होते. ट्विन स्टडीमध्ये अंतराळात पाठवलेल्या भावाचे वय पृथ्वीवर असलेल्या भावापेक्षा कमी वाटत होते. ते जास्त युवा दिसत होते. त्यांच्या शरीरातील ९१.३ टक्के जीन्समध्ये बदल झाला होता. परंतु ६ महिन्यांनी पुन्हा पर्ववत झाले.
मेंदूवरही परिणाम होतो
शरीराशिवाय मेंदूवरही अंतराळाचा परिणाम काय होतो हे जाणून घेण्यासाठी स्टडी सुरू आहे. अशी एक स्टडी अमेरिकेत झाली आहे. अभ्यासासाठी अशा १२ अंतराळवीरांना घेतले गेले जे ६ महिन्याहून अधिक काळ अंतराळात राहिले आहेत. स्पेस जाण्यापूर्वी त्यांचे इमेजिंग झाले होते. परंतु अंतराळ स्टेशनहून पृथ्वीवर येण्यासाठी फ्लाईट घेण्यापूर्वी MRI करण्यात आले. १० दिवसांनी पुन्हा तेच केले. सात महिने ही प्रक्रिया सुरू होती.
अंतराळ असलेल्या वातावरणात मेंदू विविध प्रकारे व्यवहार करू लागला. त्याठिकाणी शरारीचे वजन संपून जाते. त्यावर कंट्रोल करण्यासाठी ब्रेन विविध संकेत देत असतो. जे १-२ दिवस नाही तर अनेक महिन्यांपर्यंत चालते. ब्रेनच्या रि-वायरिंगसाठी इतका वेळ खूप आहे. पृथ्वीवर परतल्यानंतर अंतराळवीरांना जमीनवर चालण्यासाठी आणि तोल सावरण्यासाठी आव्हानात्मक बनते. बहुतांश अंतराळवीर दिर्घकाळ बोलणे आणि लोकांसोबत भेटणे हेदेखील कठीण होते. अनेकांच्या डोळ्यावरही परिणाम होतो.