अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर ‘आॅर्थर’

By admin | Published: July 5, 2014 05:32 AM2014-07-05T05:32:57+5:302014-07-05T05:32:57+5:30

अमेरिकी स्वातंत्र्य दिवसाच्या पूर्वसंध्येला सागरी वादळ ‘आॅर्थर’ उत्तर कॅरोलिनापर्यंत पोहोचले आहे

'Ather' on the east coast of the United States | अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर ‘आॅर्थर’

अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर ‘आॅर्थर’

Next

मियामी : अमेरिकी स्वातंत्र्य दिवसाच्या पूर्वसंध्येला सागरी वादळ ‘आॅर्थर’ उत्तर कॅरोलिनापर्यंत पोहोचले आहे. यामुळे पूर्व किनाऱ्यानजीकच्या भागात राहणाऱ्या लाखो लोकांचे जीवन विस्कळीत झाले आहे. भारतीय वेळेनुसार शुक्रवारी सकाळी सुमारे ८.४५ वाजता ‘आॅर्थर’ केप लुकआऊट आणि बीयूफोर्ट किनाऱ्यावर पोहोचले.हे वादळ ताशी १६० किलोमीटर ताशी वेगाने आगेकूच करत आहे. हवामान विभागाने उत्तर कॅरोलिनातील नागरिकांसाठी इशारा जारी केला आहे. ४ जुलै रोजी हजारो पर्यटक सार्वजनिक सुटीनिमित्त पर्यटक येऊन ठेपल्याने आपत्कालीन तयारीत अडचणी उद्भवत आहे.
असल्याचे उत्तर कॅरोलीनाचे गर्व्हनर मॅकक्रॉय यांनी सांगितले.

Web Title: 'Ather' on the east coast of the United States

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.