भाजीपाल्याच्या कंटेनरमधून निघणाऱ्या विषारी गॅसनं 6 जणांचा मृत्यू, 15 गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 10:30 AM2020-02-17T10:30:55+5:302020-02-17T10:31:02+5:30
पाकिस्तानच्या कराचीमधून सर्वात मोठी बातमी आली आहे. कराचीमध्ये विषारी वायुगळती झाल्यानं कमीत कमी 6 जणांचा मृत्यू झाला आहे.
कराचीः पाकिस्तानच्या कराचीमधून सर्वात मोठी बातमी आली आहे. कराचीमध्ये विषारी वायुगळती झाल्यानं कमीत कमी 6 जणांचा मृत्यू झाला आहे. सुरुवातीला न्यूक्लियर गॅस (Nuclear Gas) लीक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यानंतर भाजीपाल्याच्या कंटेनरमधून विषारी वायूची गळती होत असल्याचं निदर्शनास आलं. दुर्घटनेच्या स्थळावरून कराची न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन (Karachi Nuclear Power Corporation)पासून जवळ आहे.
पाकिस्ताननं तपासासाठी तिकडे न्यूक्लियर बायोलॉजिकल केमिकल डॅमेज टीमला पाठवलं आहे. सध्या परिसरात गोंधळाचं वातावरण आहे. जिओ टीव्हीनुसार, आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला असून, 15 जण गंभीर आहेत. तर जवळपास 100 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
स्थानिक मीडियाच्या रिपोर्टनुसार, सुरुवातीच्या चौकशीत समजलं की, जॅक्सन मार्केटमध्ये काही जणांनी कंटेनर उघडला, त्यातून धूर बाहेर आला. त्यानंतर लोकांना श्वासोच्छवास घेण्यास त्रास होऊ लागला आणि काही जण बेशुद्ध झाले. त्यांना जवळच्याच खासगी रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे.