'नरेंद्र मोदींच्या पक्षाकडून भारतीय मुस्लिमांवर अत्याचार', बिलावल भुट्टोने पुन्हा गरळ ओकली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 02:23 PM2022-12-20T14:23:45+5:302022-12-30T07:54:37+5:30

यापूर्वी बिलावल भुट्टोने पीएम नरेंद्र मोदींना 'गुजरातचा कसाई' म्हटले होते.

'Atrocities against Indian Muslims by Narendra Modi's party', Bilawal Bhutto again raised the issue | 'नरेंद्र मोदींच्या पक्षाकडून भारतीय मुस्लिमांवर अत्याचार', बिलावल भुट्टोने पुन्हा गरळ ओकली

'नरेंद्र मोदींच्या पक्षाकडून भारतीय मुस्लिमांवर अत्याचार', बिलावल भुट्टोने पुन्हा गरळ ओकली

googlenewsNext

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल झरदारी भुट्टो यांनी पुन्हा एकदा भारताविरोधात गरळ ओकली आहे. नरेंद्र मोदी यांच्या पक्षाकडून भारतातील मुस्लिमांवर अत्याचार होत असल्याचा आरोप बिलावल यांनी एका मुलाखतीदरम्यान केला. भारत सरकार गुजरातमधील मुस्लिमांवर खूप अत्याचार करत आहे, असेही ते म्हणाले. वॉशिंग्टन डीसीमध्ये ब्लूमबर्ग टेलिव्हिजनला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

विशेष म्हणजे, भुट्टो यांनी यापूर्वीही नरेंद्र मोदींवर वैयक्तिक हल्ले केले होते. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी फटकारल्यामुळे संतप्त झालेल्या पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी मोदींवर अपमानास्पद टीका करत, त्यांना 'गुजरातचा कसाई' असे संबोधले होते. ओसामा बिन लादेनचा मृत्यू झाला, पण 'गुजरातचा कसाई' अजूनही जिवंत आहे आणि तो भारताचा पंतप्रधान आहे, असे वादग्रस्त वक्तव्य भुट्टोंनी केले होते.

भारताचे भुट्टोला प्रत्युत्तर 
बिलावलने पंतप्रधान मोदींवर केलेल्या अशोभनीय वक्तव्यावर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र प्रतिक्रिया दिली होती. एक निवेदन जारी करताना भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने बिलावलचे वक्तव्य असभ्य असल्याचे म्हटले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे देताना सांगितले की, यावरून पाकिस्तान भारताविरुद्ध विष ओकण्यासाठी कोणत्या थराला जाऊ शकतो हे दिसून येते, असे ते म्हणाले.

तसेच, पाकिस्तानला 1971 ची आठवण करून देताना भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते की बिलावल झरदारी भुट्टो बहुधा 1971 विसरले आहेत. तेव्हा पाकिस्तान सरकारने बंगाली आणि हिंदूंची हत्या केली होती. पाकिस्तानला दहशतवाद्यांचे आश्रयस्थान असल्याचे सांगून परराष्ट्र मंत्रालयाने असेही म्हटले की, पाकिस्तान हा एकमेव देश आहे, जो दहशतवादी ओसामा बिन लादेनला शहीद दाखवतो. 

Web Title: 'Atrocities against Indian Muslims by Narendra Modi's party', Bilawal Bhutto again raised the issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.