चार्ली हेब्दोतील व्यंगचित्र छापणा-या जर्मनीतील वृत्तपत्रावर हल्ला

By admin | Published: January 11, 2015 02:39 PM2015-01-11T14:39:06+5:302015-01-11T14:39:17+5:30

फ्रान्समधील चार्ली हेब्दो या मासिकातील व्यंगचित्र छापल्याने जर्मनीतील हामबर्गर मोगेनपोस्ट या वृत्तपत्राच्या प्रिटिंग प्रेसवर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याची घटना घडली आहे.

Attack on German newspaper Charlie Hebdo cartoon printing newspaper | चार्ली हेब्दोतील व्यंगचित्र छापणा-या जर्मनीतील वृत्तपत्रावर हल्ला

चार्ली हेब्दोतील व्यंगचित्र छापणा-या जर्मनीतील वृत्तपत्रावर हल्ला

Next

 

ऑनलाइन लोकमत 
बर्लिन, दि. ११ - फ्रान्समधील चार्ली हेब्दो या मासिकातील व्यंगचित्र छापल्याने जर्मनीतील हामबर्गर मोगेनपोस्ट या वृत्तपत्राच्या प्रिटिंग प्रेसवर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नसले तरी हल्लेखोरांनी ज्वलनशील पदार्थ फेकल्याने प्रेसमधील काही महत्त्वपूर्ण कागदपत्र जळून खाक झाली. 
फ्रान्समधील चार्ली हेब्दो या मासिकाच्या पॅरिसमधील मुख्यालयावर गेल्या आठवड्यात दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात १० पत्रकार आणि २ पोलिस अधिका-यांचा मृत्यू झाला होता. चार्ली हेब्दोमध्ये २०११ मध्ये पैगंबराचे वादग्रस्त व्यंगचित्र प्रकाशित झाले होते आणि याच्या निषेधार्थच हा भ्याड दहशतवादी हल्ला झाला होता. चाली हेब्दोमधील वादग्रस्त व्यंगचित्र जर्मनीतील वृत्तपत्रांनीही छापले होते. स्थानिक वेळेनुसार रात्री उशीरा अज्ञात हल्लेखोरांनी हामबर्गर मोगेनपोस्ट या वृत्तपत्राच्या इमारतीवर हल्ला केला. हल्लेखोरांनी इमारतीवर दगडफेक केली तसेच इमारतीच्या आत ज्वलनशील पदार्थही फेकले. सुदैवाने या हल्ल्याच्या वेळी कार्यालयात एकही कर्मचारी नव्हता व त्यामुळे जीवितहानी टळली. याप्रकरणी जर्मनी पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु आहे. हा हल्ला चार्ली हेब्दोचे व्यंगचित्र छापल्याने झाला होता असे समजते. पोलिसांनीही या दिशेने तपास सुरु केला आहे. 

Web Title: Attack on German newspaper Charlie Hebdo cartoon printing newspaper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.