इराणचा हल्ला; पाकिस्तानचा झाला तीळपापड, राजदूतांना परत बोलावले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 07:51 AM2024-01-18T07:51:24+5:302024-01-18T07:52:32+5:30
आगामी काळात नियोजित द्विपक्षीय भेटी स्थगित केल्या.
इस्लामाबाद : इराणनेपाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतातील अतिरेकी तळावर क्षेपणास्त्र व ड्रोन हल्ले केल्यानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला. पाकिस्तानने बुधवारी इराणमधील राजदूतांना परत बोलावत गंभीर परिणामांचा इशाराही दिला. तसेच आगामी काळात नियोजित द्विपक्षीय भेटी स्थगित केल्या.
इराणने मंगळवारी पाकिस्तानच्या बलुची दहशतवादी गट जैश अल-अदलच्या दोन तळांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. त्यात दोन मुले ठार व तीन जखमी झाली. त्यानंतर ‘इराणचे हल्ले पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचे, आंतरराष्ट्रीय कायदा, संयुक्त राष्ट्रांच्या सनदेच्या उद्देशांचे आणि तत्त्वांचे उल्लंघन आहे. त्याचा आम्ही निषेध करतो. या कृतीला प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आम्हाला आहे. परिणामांची जबाबदारी पूर्णपणे तुमची असेल. तसेच आम्ही इराणमधून आमचे राजदूत परत बोलावण्याचा निर्णय घेतला आहे,’ अशा शब्दात पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने इराण सरकारला खडसावले.