पाकमध्ये राजकीय सभेत माेठा दहशतवादी हल्ला, ३५ ठार, २०० जखमी; चौकशीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 06:31 AM2023-07-31T06:31:44+5:302023-07-31T06:31:44+5:30

राजकीय सभेत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ३५ ठार, तर २०० जण गंभीर जखमी झाल्याचे पाकिस्तानी टीव्ही चॅनल ‘जिओ न्यूज’ने म्हटले आहे.

Attack on meeting in Pakistan, 35 killed | पाकमध्ये राजकीय सभेत माेठा दहशतवादी हल्ला, ३५ ठार, २०० जखमी; चौकशीचे आदेश

पाकमध्ये राजकीय सभेत माेठा दहशतवादी हल्ला, ३५ ठार, २०० जखमी; चौकशीचे आदेश

googlenewsNext

पेशावर : पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा येथील बाजौरमध्ये रविवारी एका राजकीय सभेत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ३५ ठार, तर २०० जण गंभीर जखमी झाल्याचे पाकिस्तानी टीव्ही चॅनल ‘जिओ न्यूज’ने म्हटले आहे.

सत्ताधारी आघाडीचा भाग असलेल्या जमियत उलेमा इस्लाम फजल (जेयूआय-एफ) ची रॅली येथे सुरू होती. यावेळी अचानक स्फोट झाला. पोलिसांनी सांगितले की, हा दहशतवादी हल्ला असून, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे. 

जेयूआय-एफचे  ज्येष्ठ नेते हाफिज हमदुल्ला हे या रॅलीला संबोधित करणार होते. घटनेनंतर ते म्हणाले की, या स्फोटात आमचे ३५ कार्यकर्ते ठार झाले आहेत. मी या घटनेचा निषेध करतो, अशा हल्ल्यांनी आमचे मनोबल कमी होणार नाही.

कार्यकर्त्यांमध्येच हल्लेखोर
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी साडेचारच्या सुमारास हा स्फोट झाला यावेळी रॅलीत अनेकांची उपस्थिती होती. पक्षाच्या समर्थकांमध्येच हल्लेखोर उपस्थित होते, असे मानले जात आहे. त्यामुळे हा फिदाईन हल्ला मानला जात आहे.

आणखी एक षड्यंत्र
या घटनेनंतर जेयूआय-एफचे प्रमुख मौलाना फजल यांनी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याशी बोलून त्यांना सविस्तर माहिती दिली. सरकारनेही या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी यांनी हा हल्ला देशाला कमकुवत करण्याचे आणखी एक षड्यंत्र आहे. दहशतवाद्यांशी सामना करण्यासाठी सरकार कोणत्याही थराला जाऊ शकते, असे म्हटले.
 

Web Title: Attack on meeting in Pakistan, 35 killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.