सिरियात रशियन दूतावासावर हल्ला
By Admin | Published: October 14, 2015 01:07 AM2015-10-14T01:07:36+5:302015-10-14T01:07:36+5:30
सिरियातील रशियाच्या दूतावासावर मंगळवारी दोन रॉकेट्सने हल्ला करण्यात आला. सिरियातील इस्लामिक स्टेटविरुद्ध लढ्यात सहभागी होत रशियाने सिरियात या संघटनेच्या अड्ड्यांवर हवाई हल्ले सुरू केले आहेत.
दमास्कस : सिरियातील रशियाच्या दूतावासावर मंगळवारी दोन रॉकेट्सने हल्ला करण्यात आला. सिरियातील इस्लामिक स्टेटविरुद्ध लढ्यात सहभागी होत रशियाने सिरियात या संघटनेच्या अड्ड्यांवर हवाई हल्ले सुरू केले आहेत. रशियाच्या या कारवाईच्या समर्थनार्थ आणि रशियाचे आभार मानण्यासाठी मोठ्या संख्येने सिरियन नागरिक दूतावासाबाहेर रॅलीसाठी आलेले असताना हा हल्ला झाला. विशेष म्हणजे एक दिवसापूर्वीच अल-काईदाशी संलग्नित ‘अल-नुसरा फ्रन्ट’ या संघटनेने रशियन नागरिक व सैनिकांवर हल्ले करण्याचे आवाहन केले होते.
हल्ल्यानंतर दूतावासाबाहेर जमलेल्या लोकांत घबराट पसरली. इंटरफॅक्सच्या वृत्तानुसार या हल्ल्यात जीवितहानी झाली नाही. हा हल्ला झाला त्यावेळी दूतावासाबाहेर रशियाच्या समर्थनार्थ ३०० लोक जमले होते.