फ्रान्सच्या विमानतळावरील हल्लेखोर ठार
By Admin | Published: March 19, 2017 03:18 AM2017-03-19T03:18:02+5:302017-03-19T03:18:02+5:30
फ्रान्सच्या पॅरिस शहरातील उत्तरेकडील भागात असलेल्या ओर्ली विमानतळावरील महिला सुरक्षा रक्षकाकडे असणारी रायफल हिसकाविण्याचा प्रयत्न करणा-या हल्लेखोरास ठार करण्यात आले आहे.
>ऑनलाइन लोकमत
पॅरिस, दि. 19 - फ्रान्सच्या पॅरिस शहरातील उत्तरेकडील भागात असलेल्या ओर्ली विमानतळावरील महिला सुरक्षा रक्षकाकडे असणारी रायफल हिसकाविण्याचा प्रयत्न करणा-या हल्लेखोरास ठार करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ओर्ली विमानतळावर भारतीय वेळेनुसार शनिवारी रात्री १२.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. सियाद बेन बेलगसेम असे या हल्लेखोराचे नाव असून त्याने गोळीबार करुन विमानतळावरील महिला सुरक्षा रक्षकाकडे असलेली रायफल हिसकविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर विमानतळावरील एक कार ताब्यात घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, घटनास्थळी असलेल्या दोन सुरक्षा रक्षकांनी त्याच्या दिशेने गोळीबार करत त्याला ठार केले.
दरम्यान, सियाद बेन बेलगसेम याला ठार मारल्यानंतर पोलिसांनी त्याच्या घराची चौकशी केली. यावेळी त्याच्या घरातून कोकीन जप्त करण्यात आले. तर याप्रकरणी सियाद बेन बेलगसेम याच्या वडिलांना आणि भावाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तपास सुरु आहे.