‘आफ्रिकनांवरील हल्ले तिरस्करणीय’
By admin | Published: June 1, 2016 03:51 AM2016-06-01T03:51:50+5:302016-06-01T03:51:50+5:30
भारतात आफ्रिकन नागरिकांवर गेल्या काही दिवसांत झालेले हल्ले हे तिरस्करणीय आहेत. ते नागरिक आमचे पाहुणे आहेत, असे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी म्हटले.
रब्बात (मोरोक्को) : भारतात आफ्रिकन नागरिकांवर गेल्या काही दिवसांत झालेले हल्ले हे तिरस्करणीय आहेत. ते नागरिक आमचे पाहुणे आहेत, असे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी म्हटले.
हल्ला मग तो स्वत:च्या देशवासीयांवर असो की, पाहुण्यांवर तिरस्करणीयच आहे, असे ते म्हणाले. सर्व प्रकारच्या हिंसेचा निषेध करण्याशिवाय कोणीही व्यक्ती
किंवा सरकार यापेक्षा वेगळे
काही म्हणू शकणार नाही, असे ते म्हणाले.
आफ्रिकन देशांशी भारताचे संबंध चांगले आहेत, असे सांगून अन्सारी म्हणाले की, ते (आफ्रिकन्स) आमचे पाहुणे आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचे उल्लंघन झालेल्या परिस्थितीत त्यांची आम्ही काळजी घेतली पाहिजे. आफ्रिकन देशांशी आमच्या असलेल्या संबंधांचे आम्हाला मोठे महत्त्व असून आम्ही नेहमीच त्यांच्या बाजूने आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. अन्सारी हे मोरोक्को आणि ट्यूनिशिया देशाच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत.