आफ्रिकेमध्ये चीनच्या सोन्याच्या खाणीवर हल्ला; 9 चिनी मजूर ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 11:05 AM2023-03-20T11:05:46+5:302023-03-20T11:06:02+5:30

मध्य आफ्रिकेतील सोन्याच्या खाणीत काम करणाऱ्या चिनी मजुरांवर जिवघेणा हल्ला झाला आहे.

Attacks on Chinese Gold Mines in Africa; 9 Chinese laborers killed | आफ्रिकेमध्ये चीनच्या सोन्याच्या खाणीवर हल्ला; 9 चिनी मजूर ठार

आफ्रिकेमध्ये चीनच्या सोन्याच्या खाणीवर हल्ला; 9 चिनी मजूर ठार

googlenewsNext

जगाला सतत काही ना काही गोष्टींवरून चिंतेत टाकणाऱ्या चीनचे आता दिवस फिरू लागले आहेत. भारताला त्रास देण्यासाठी पाकव्याप्त काश्मीरमधून अरब राष्ट्रांना जोडणाऱ्या प्रकल्पात चीन पुरता डुबला आहे. चिनी कंपन्यांनी आता तिथून हात काढण्यास सुरुवात केली आहे. असे असताना आता चीनसाठी दक्षिण आफ्रिकेतून वाईट बातमी येत आहे. 

मध्य आफ्रिकेतील सोन्याच्या खाणीत काम करणाऱ्या चिनी मजुरांवर जिवघेणा हल्ला झाला आहे. यामध्ये नऊ चिनी मजुरांचा मृत्यू झाला असून विद्रोहिंनी आपला या हल्ल्याशी काही संबंध नाहीय असे म्हणत हात वर केले आहेत. विद्रोहींनी रशियाच्या वॅगनआर ग्रुपला जबाबदार असल्याचे म्हटले आहे. 

खाणींच्या प्रशासनाने म्हटले आहे की, काही बंदुकधारी लोकांनी या खाणीवर हल्ला केला. यामध्ये चिनी मजुर ठार झाले आहेत. बांबरीचे नगराध्यक्षांनी सांगितले की, नऊ मृतदेहांची मोजणी करण्यात आली आहे. या हल्ल्यात दोन जण जखमीही झाले आहेत. ते गोल्ड कोस्ट ग्रुपद्वारे चालवल्या जाणाऱ्या खाणीत काम करत होते. ही खाण चीन चालवत असल्याचे समजते. 

चिनी दूतावासाच्या वतीने नागरिकांना राजधानी बांगुईच्या बाहेर न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. स्थानिक वेळेनुसार पहाटे पाच वाजता चिंबोलो येथील सोन्याच्या खाणीवर हल्ला झाला. ही खाण काही काळापूर्वी सुरू करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी कॅमेरूनला लागून असलेल्या पश्चिम सीमेवर तीन चिनी नागरिकांचे अपहरण करण्यात आले होते. या घटनेनंतर राअध्यक्ष फॉस्टिन अर्चंगाई तुदार यांनी चिनी गुंतवणूकदारांसह येथे भेट दिली होती. 
 

Web Title: Attacks on Chinese Gold Mines in Africa; 9 Chinese laborers killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.