सुटकेचे प्रयत्न निष्फळ; दोन ओलिसांचा मृत्यू
By admin | Published: December 6, 2014 11:45 PM2014-12-06T23:45:35+5:302014-12-06T23:45:35+5:30
येमेनमधील अल-कायदाने ओलिस ठेवलेले अमेरिकी पत्रकार ल्युक सोमर्स व अन्य एकाची सुटका करण्याच्या अमेरिकी विशेष दलांच्या प्रयत्नादरम्यान दहशतवाद्यांनी या दोन्ही ओलिसांची हत्या केली.
Next
वॉशिंग्टन : येमेनमधील अल-कायदाने ओलिस ठेवलेले अमेरिकी पत्रकार ल्युक सोमर्स व अन्य एकाची सुटका करण्याच्या अमेरिकी विशेष दलांच्या प्रयत्नादरम्यान दहशतवाद्यांनी या दोन्ही ओलिसांची हत्या केली.
ल्युक यांना अल-कायदा दहशतवाद्यांनी ओलिस ठेवले होते. त्यांच्या सुटकेसाठी अमेरिकेच्या विशेष दलांनी मोहीम राबवली; मात्र ही मोहीम अयशस्वी ठरली. सुटका मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी ओलिसांची हत्या केली. ठार झालेले दुसरे ओलिस दक्षिण आफ्रिकन शिक्षक पर्िे कोरकी असल्याचे सांगण्यात आले. दहशतवाद्यांनी सोमर्स यांना मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे परिस्थितीचा आढावा घेऊन मी त्यांच्या सुटकेसाठी मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते, असे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटले आहे.
एकाची आज होणार होती सुटका
दरम्यान, अल-कायदाकडून कोरकी यांची शनिवारी सुटका करण्यात येणार होती. त्यानंतर ते येमेनमधून बाहेर पडून कुटुंबियांना भेटणार होते, असे एका स्वयंसेवी संस्थेने सांगितले. (वृत्तसंस्था)