बांगलादेशात विमान हायजॅक करण्याचा प्रयत्न; सर्व प्रवासी सुखरुप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2019 07:22 PM2019-02-24T19:22:55+5:302019-02-24T19:26:36+5:30
बांगलादेशात एक विमान हायजॅक करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना रविवारी संध्याकाळी घडली.
ढाका : बांगलादेशात एक विमान हायजॅक करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना रविवारी संध्याकाळी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, चत्तोग्राम येथील शाह अमानत आंतरराष्ट्रीय विमानतळावर ढाकाहून दुबईला जाणारे विमान हायजॅक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी हायजॅक करणाऱ्या व्यक्तीने विमानातच गोळीबार केला. मात्र, त्याला प्रत्युत्तर देत सुरक्षा रक्षकांनी विमान हायजॅक करण्याचा प्रयत्न हाणून पाडला. तसेच, गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या गोळीबारात विमानातील क्रू मेंबर एक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
AFP: Attempt to hijack Dubai-bound plane in Bangladesh pic.twitter.com/T08qeJwPF0
— ANI (@ANI) February 24, 2019
येथील स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी सव्वा पाच वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी बांगलादेशातील एका खासदारासह अनेक प्रवासी विमानातून प्रवास करत होते. या घटनेत सर्व प्रवासी सुखरुप असल्याचे समजते.