डोनाल्ड ट्रम्प यांना मारण्याचा प्रयत्न! व्हाईट हाऊसमध्ये पोहोचण्यापूर्वीच पकडलं विषाचं पाकीट
By श्रीकृष्ण अंकुश | Published: September 20, 2020 12:42 PM2020-09-20T12:42:01+5:302020-09-20T12:49:38+5:30
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पाकीट ‘रिसिन’ नावाच्या विषाने भरलेले होते. रिसिनच्या संपर्कात याणाऱ्याचा 36 ते 72 तासांत मृत होऊ शकतो. रिसिनसाठी अद्याप कुठल्याही प्रकारचे अँटीडोट उपलब्ध नाही.
वॉशिंग्टन - अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीचे वारे वाहत असतानाच, एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाने आलेले विषाने भरलेले एक पाकीट व्हाईट हाऊसमध्ये पोहोचण्यापूर्वीच जप्त केले आहे. यामुळे अध्यक्ष पदाच्या निवडणुकीपूर्वीच ट्रम्प यांच्या हत्येचे षडयंत्र रचले जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पाकीट ‘रिसिन’ नावाच्या विषाने भरलेले होते. हे पाकीट व्हाईट हाऊसमध्ये येणाऱ्या सर्व पत्राची आणि पार्सल्सची तपासणी करताना पकडण्यात आले. संबंधित अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटिवर सांगितले, की हे पाकिट अथवा पत्र कुणी आणि कुठून पाठवले यासंदर्भात एफबीआय तपास करत आहे.
व्हाईट हाऊससाठी आलेले कुठले पत्र अथवा पार्सल राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी तपासले जाते. हे पार्सल कॅनडा येथून आल्याचा संशय आहे.
रिसिनच्या संपर्कात येणाऱ्याचा 36 ते 72 तासांत होऊ शकतो मृत -
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रारंभिक तपासात पाकिटात रिसिन नावाचे विष असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे विष प्रामुख्याने एरण्डीच्या बियांत आढळते. महत्वाचे म्हणजे रिसिनसाठी अद्याप कुठल्याही प्रकारचे अँटीडोट उपलब्ध नाही. एखाद्या व्यक्तीच्या शरिरात हे विष गेले, तर देण्यात आलेल्या विषाच्या प्रमाणानुसार, त्या व्यक्तीचा 36 ते 72 तासांत मृत्यू होतो. अमेरिकन सेंटर फॉर डिसीज कंट्रोलने दिलेल्या माहितीनुसार, हे विष अनेक वेळा दहशतवादी हल्ल्यांतही वापरण्यात आले आहे. याचा वापर पावडर, गोळी अथवा अॅसिडच्या स्वरुपातही केला जातो.
महत्त्वाच्या बातम्या -
केंद्र सरकारच्या 3 योजना, केवळ 400 रुपयांत सुरक्षित होईल भविष्य
भारत-चीन वादात रशियाची एन्ट्री, मोठा आहे पुतीन यांचा आशिया खंडातला प्लॅन
धक्कादायक खुलासा : भारतात तब्बल 62 टक्के महिला अॅप्सच्या माध्यमाने करतात 'सेक्सटिंग'
"झोपेत घोरत असाल तर सावधान! कोरोनामुळे मृत्यूचा तिप्पट धोका"
मोदी सरकार आणतंय नवी पॉलिसी, भंगारमध्ये जाणार तुमची जुनी गाडी