ऑस्ट्रेलियात जंगलाची आग विझविण्याचे प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 06:04 AM2020-01-08T06:04:33+5:302020-01-08T06:04:44+5:30

आग्नेय ऑस्ट्रेलियात जंगलाला लागलेली प्रचंड मोठी आग विझविण्यासाठी मंगळवारी अग्निशामक यंत्रणेने मोठे प्रयत्न केले.

Attempts to extinguish a forest fire in Australia | ऑस्ट्रेलियात जंगलाची आग विझविण्याचे प्रयत्न

ऑस्ट्रेलियात जंगलाची आग विझविण्याचे प्रयत्न

Next

सिडनी : आग्नेय ऑस्ट्रेलियात जंगलाला लागलेली प्रचंड मोठी आग विझविण्यासाठी मंगळवारी अग्निशामक यंत्रणेने मोठे प्रयत्न केले. यंत्रणेच्या मदतीला तापमानात किंचित झालेली घट व खूपच आवश्यक असलेला पाऊस आला. विशेष म्हणजे या आठवड्यात उष्णतेची लाटही धडकणार आहे.
येत्या शुक्रवारी वारे पुन्हा वाहू लागण्याची अपेक्षा आहे. संभाव्य हानी मर्यादित राखण्याचा आणि येत्या दिवसांत आगीचा उद्रेक होऊ नये हा प्रयत्न आहे, असे न्यू साऊथ वेल्स रूरल फायर सर्व्हीस कमीशनर शेन फिट्झसीमन्स यांनी सांगितले.
ते म्हणाले की, सध्याची परिस्थिती बरीच काही अनुकूल आहे. परंतु, आम्हाला या आठवड्यानंतर उष्ण हवामान परत येईल अशी अपेक्षा आहे.
देशाच्या पूर्वेकडे डझनभर प्रचंड मोठ्या आगी नियंत्रणाबाहेर भडकलेल्या असून आणि न्यू साऊथ वेल्स आणि व्हिक्टोरियातील आग एक होऊन तिसरी अनियंत्रित महा आग तयार होते की काय याची भीती असल्याचे ते म्हणाले.

Web Title: Attempts to extinguish a forest fire in Australia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.