अटर्नी जनरल पदावरून जेफ सेशन्स बडतर्फ, ट्रम्प यांचे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2018 03:47 AM2018-11-09T03:47:57+5:302018-11-09T03:48:58+5:30

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विदेशी हस्तक्षेपाबाबत सुरू असलेल्या संवेदनशील अशा तपासावर अप्रत्यक्षरीत्या ताबा मिळविताना बुधवारी अटर्नी जनरल जेफ सेशन्स यांना तडकाफडकी बडतर्फ करण्याचे पाऊल उचलले.

Attorney General Jeff Sessions dismiss | अटर्नी जनरल पदावरून जेफ सेशन्स बडतर्फ, ट्रम्प यांचे पाऊल

अटर्नी जनरल पदावरून जेफ सेशन्स बडतर्फ, ट्रम्प यांचे पाऊल

Next

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विदेशी हस्तक्षेपाबाबत सुरू असलेल्या संवेदनशील अशा तपासावर अप्रत्यक्षरीत्या ताबा मिळविताना बुधवारी अटर्नी जनरल जेफ सेशन्स यांना तडकाफडकी बडतर्फ करण्याचे पाऊल उचलले. ट्रम्प यांनी २०१६ च्या सार्वत्रिक निवडणुकीत रशियाची मदत घेतल्याचा आरोप झाल्यानंतर त्याबाबत तपास सुरू आहे.
सेशन्स यांनी या तपासापासून स्वत:ला वेगळे केल्यानंतर गेल्या काही महिन्यांपासून ट्रम्प यांच्यावर जाहीररीत्या टीका चालविली होती. काळजीवाहू अटर्नी जनरल आणि रिपब्लिकन पक्षाशी निष्ठ असलेले मॅथ्यू जी व्हिटकर हे आता सेशन्स यांची जागा घेतील. रशियाने अमेरिकेच्या निवडणुकीत हस्तक्षेप केल्याप्रकरणी तपास करणाऱ्या चमूचे नेतृत्व रॉबर्ट मुल्लर यांच्याकडे असून व्हिटकर हे त्यांचे विरोधक मानले जातात. सेशन्स यांना पदावरून हटविल्यानंतर ट्रम्प यांनी टिष्ट्वट जारी करीत म्हटले की, न्यायालयीन विभागाचे अटर्नी जनरल जेफ सेशन्स यांच्या जागी चीफ आॅफ स्टाफ मॅथ्यू जी व्हिटकर यांची नियुक्ती करताना मला आनंद होत आहे. ते आपल्या देशाची चांगल्या प्रकारे सेवा करतील. व्हिटकर यांच्या सेवेसाठी मी त्यांचे आभार मानतो आणि शुभेच्छा देतो. यानंतर त्यांच्या कायम नियुक्तीची घोषणा केली जाईल.

सीएनएनच्या पत्रकाराचा पास निलंबित....

सीएनएन वाहिनीचे व्हाईट हाऊसमधील वार्ताहर जिम अकोस्टा यांचा पास व्हाईट हाऊसने निलंबित केल्यामुळे माध्यम जगतात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. हा लोकशाहीला धोका असल्याची प्रतिक्रिया सीनएनएनने दिली आहे.बुधवारी पत्रकार परिषदेत ट्रम्प यांची अकोस्टा यांच्याशी शाब्दिक चकमक झडल्यानंतर व्हाईट हाऊसने अकोस्टा यांचे वर्तन निंदनीय आणि संतापजनक असल्याचे स्पष्ट केले होते. अमेरिकेच्या सीमेकडे आगेकूच करणाºया मध्य अमेरिकींच्या लोंढ्यांबाबत अकोस्टा यांना ट्रम्प यांना सातत्याने प्रश्न विचारून भंडावून सोडले होते. त्यानंतर ट्रम्प यांनी त्यांना शांतपणे बसण्यास सांगितले मात्र अकोस्टा यांनी पुन्हा प्रश्न विचारल्याने ट्रम्प यांनी संतप्त होत ‘‘आता खूप झाले’’ या शब्दांत सुनावले.

Web Title: Attorney General Jeff Sessions dismiss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.