दोन हजार कांगारूंना आॅस्ट्रेलिया संपवणार

By Admin | Published: May 15, 2016 05:12 AM2016-05-15T05:12:42+5:302016-05-15T05:12:42+5:30

कांगारूंचा देश म्हणून ओळख असलेल्या आॅस्ट्रेलियाला आता कांगारूंची संख्या कशी कमी करावी, असा प्रश्न पडला असून, त्यासाठी त्यांच्यावर उपचार करून त्यांची जननक्षमता थांबवण्याचे

Australia to finish two thousand kangaroo | दोन हजार कांगारूंना आॅस्ट्रेलिया संपवणार

दोन हजार कांगारूंना आॅस्ट्रेलिया संपवणार

googlenewsNext

मेलबर्न : कांगारूंचा देश म्हणून ओळख असलेल्या आॅस्ट्रेलियाला आता कांगारूंची संख्या कशी कमी करावी, असा प्रश्न पडला असून, त्यासाठी त्यांच्यावर उपचार करून त्यांची जननक्षमता थांबवण्याचे वा कमी करण्याचे तेथील वन प्रशासनाने ठरवले आहे. पण तेवढे पुरेसे नसल्याने आॅस्ट्रेलियाच्या राजधानी परिसरातील १0 अभयारण्यांमध्ये असलेल्या तब्बल १९९१ कांगारूंना मारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हे करण्यासाठी मोहीमच उघडण्यात येणार असून, रोज संध्याकाळी ही सारी अभयारण्ये बंद ठेवण्यात येणार आहेत. त्या काळात कांगारूंना मारण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले आहे.

Web Title: Australia to finish two thousand kangaroo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.