3 पुरूषांनी एकाच महिलेला डोनेट केले स्पर्म, प्रेग्नेंट झाली तेव्हा सगळेच झाले हैराण; कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 04:03 PM2022-08-08T16:03:59+5:302022-08-08T16:04:23+5:30

लेस्बियन कपलने तीन पुरूषांकडून स्पर्म घेतले. पण स्पर्म डोनेट करणाऱ्या लोकांना वाटत होतं की, महिला तीन नाही तर एकाच व्यक्तीचं स्पर्म वापरेल. ही घटना ऑस्ट्रेलियातील सिडनीची आहे.

Australia lesbian couple mixed sperm donated by three men to give birth know what happen next | 3 पुरूषांनी एकाच महिलेला डोनेट केले स्पर्म, प्रेग्नेंट झाली तेव्हा सगळेच झाले हैराण; कारण...

3 पुरूषांनी एकाच महिलेला डोनेट केले स्पर्म, प्रेग्नेंट झाली तेव्हा सगळेच झाले हैराण; कारण...

Next

एका लेस्बियन कपलला (Lesbian Couple) बाळाला जन्म द्यायचा होता. यासाठी कपलने फेसबुकवर ग्रुपच्या माध्यमातून पुरूषांकडे स्पर्मची मागणी केली होती. यानंतर स्पर्म डोनेशनसाठी 3 पुरूष तयार झाले. पण त्यानंतर हैराण करणारी घटना घडली.

लेस्बियन कपलने तीन पुरूषांकडून स्पर्म घेतले. पण स्पर्म डोनेट करणाऱ्या लोकांना वाटत होतं की, महिला तीन नाही तर एकाच व्यक्तीचं स्पर्म वापरेल.
ही घटना ऑस्ट्रेलियातील सिडनीची आहे. लॉकडाउन दरम्यान सप्टेंबर 2021 मध्ये कपलने तीन वेगवेगळ्या पुरूषांकडून स्पर्म घेतले. या लोकांना माहिती न देता कपलने तीन लोकांचे स्पर्म एकत्र करून वापरले आणि महिला प्रेग्नेंट झाली. 

यातील एका पुरूषाने Kidspot सोबत बोलताना सांगितलं की, नैतिक दृष्टीने बाळासाठी पुरूषांचे स्पर्म मिक्स करणं योग्य नाही. खासकरून तेव्हा जेव्हा आम्हाला माहितीही दिली गेली नाही आणि आमची परवानगीही घेतली गेली नाही.

आता या पुरूषांना हे काहीच माहीत नाही की, बाळ इंडियन आहे, चीनी आहे की ऑसस्ट्रेलियन. कपलने यातील एका पुरूषाला सांगितलं की, ते बाळांची डीएनए टेस्ट करणार आहेत.

तेच सत्य समोर आल्यानंतर स्पर्म डोनेट करणारा एक पुरूष म्हणाला की, मी बाळासाठी फार एक्सायटेड होतो. पण सत्य समजल्यावर मी दु:खी झालो. मला वाटतं माझ्या अशा गोष्टीसाठी फसवणूक करण्यात आली जी मी फ्रीमध्ये देत होतो. 

Web Title: Australia lesbian couple mixed sperm donated by three men to give birth know what happen next

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.