ऑस्ट्रेलियावर मोठा सायबर हल्ला; सरकारसह खासगी क्षेत्रालाही फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 08:18 AM2020-06-19T08:18:54+5:302020-06-19T16:47:30+5:30
सरकारसह खासगी क्षेत्रावर निशाणा साधण्यात आला असून त्यांना मोठा फटका बसल्याची माहिती मिळत आहे.
ऑस्ट्रेलियावर मोठा सायबर हल्ला झाला आहे. सरकारसह खासगी क्षेत्रावर निशाणा साधण्यात आला असून त्यांना मोठा फटका बसल्याची माहिती मिळत आहे. वृत्तसंस्था एएफपीने दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला संघटीत गँगकडून करण्यात आला आहे किंवा त्यामागे एखादा देश असू शकतो याचा तपास सध्या करण्यात येत आहे.
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑस्ट्रेलियाच्या खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील संघटनांना लक्ष्य करुन कोणत्यातरी परदेशी संस्थेने हा मोठा सायबर हल्ला केला आहे. तसेच आम्हाला माहीत आहे की हे अत्यंत गुंतागुंतीचे आहे. हा सायबर हल्ला कोणत्या मार्गाने केला गेला आणि त्याचे लक्ष्य असलेल्या संस्थांवर आणि मोठ्या प्रमाणात होणारा परिणाम स्पष्ट आहे. ऑस्ट्रेलियन सरकार या सायबर हल्ल्यांच्या धोक्याबाबत सावध व सतर्क असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
Australia under broad cyberattack from 'state' actor: AFP news agency quoting Prime Minister Scott Morrison (file pic) https://t.co/wiFFpAfWKkpic.twitter.com/uxwF5jYXPv
— ANI (@ANI) June 18, 2020
पंतप्रधान मॉरिसन यांनी ही नवीन जोखीम नाही. मात्र या हल्ल्याचे एक वैशिष्ट्य म्हणजे यांनी काही विशिष्ट संघटनांना लक्ष्य केले. म्हणून सर्व ऑस्ट्रेलियन संघटनांना स्वत: च्या संरक्षणासाठी योग्य ती पावले उचलण्याचा आवश्यक सल्ला देण्यात आल्याचं म्हटलं आहे. तसेच आतापर्यंतच्या तपासात मोठ्या प्रमाणात वैयक्तिक डेटा चोरी झाल्याचे उघड झालेले नाही. ऑस्ट्रेलियाच्या सुरक्षा संस्था आपल्या सहयोगी संस्थासह एकत्रितपणे याचा तपास करीत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Sushant Singh Rajput Suicide: 'सच्चा मित्र गमावला', सुशांतच्या निधनाने इस्रायल झालं भावूक
CoronaVirus News : लढ्याला यश! औषध किंवा लस नाही तर आता 'या' थेरेपीने होणार कोरोनाग्रस्तांवर उपचार?
अलर्ट! चीनी अॅपचा वापर करताय?; बसू शकतो मोठा फटका, जाणून घ्या धोका
तब्बल 21 महिने झाले तरी वडिलांनी केले नाहीत मुलावर अंत्यसंस्कार; 'हे' आहे कारण