QUAD देशांच्या बैठकीत भेटणार पंतप्रधान मोदी अन् ज्यो बायडन, चीनचं टेंशन वाढणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2021 04:01 PM2021-03-05T16:01:05+5:302021-03-05T16:02:24+5:30
क्वाड देशांत लवकरच द्विपक्षीय चर्चा होऊ शकते, असे बोलले जात आहे. या संमेलनात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा हे सामील होऊ शकतात. (Quad countries)
म्यानमारमध्ये सुरू असलेला हिंसाचार आणि चीनचा वाढता प्रभाव पाहता पहिल्यांदाच क्वाड (QUAD) देशांच्या प्रमुखांची बैठक होत आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन (Scott Morrison) यांनी यासंदर्भात माहिती दिली. "मी क्वाड देशांच्या नेत्यांसोबत होणाऱ्या बैठकीसाठी अत्यंत उत्साही आहे," असे मॉरिसन यांनी म्हटले आहे. (Australian pm said meeting will be held between quad countries soon)
"क्वाड देशांच्या नेत्यांचे हे पहिलेच संमेलन असेल. यापूर्वीही मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा (Yoshihide Suga) यांच्याशी बोललो आहे. मात्र, मी समोरा-समोरील बैठकीची वाट पाहत आहे. तसेच या संमेलनामुळे सर्वच क्वाड देशांचे संबंध अधिक बळकट होतील," असे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी म्हटले आहे.
व्हॅक्सीन घेऊन जगभरात जाणारी विमानं रिकामी येत नाहीत; जाणून घ्या, काय म्हणाले पंतप्रधान मोदी
क्वाड देशांत लवकरच द्विपक्षीय चर्चा होऊ शकते, असे बोलले जात आहे. या संमेलनात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा हे सामील होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी म्हटले आहे, की चार देशांनी एकत्रितपणे चर्चा केल्यास संबंधही अधिक चांगले होतील. याच बरोबर व्यापाराच्या दृष्टीनेही चर्चा होऊ शकेल. एवढेच नाही, तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी स्पष्ट केले आहे, की क्वाड देशांच्या या बैठकीमुळे आपसातील संबंध अधिक बळकट केले जाऊ शकतात, असेही ते म्हणाले.
अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाने चीनवर उपस्थित केले होते प्रश्नचिन्ह -
या दोन्ही देशांनी चीनचा विरोध केला आहे. गेल्या काही वर्षांत चीनने आर्थिक दृष्ट्या ऑस्ट्रेलियात आपला जम बसवला होता. मात्र, कोरोना व्हायरस पसरल्यानंतर अमेरिकेबरोबरच ऑस्ट्रेलियानेही चीनच्या चौकशीची मागणी लावून धरली होती. महत्वाचे म्हणजे, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाच्या अपीलनंतर भारतानेही WHO मध्ये चीनविरोधातील चौकशीसंदर्भातील प्रस्तावाला समर्थन दिले होते. यामुळे चीनचे पुन्हा टेंशन वाढण्याची शक्यता आहे.
अमेरिकेनं भारताकडून घेतलंय 216 अब्ज डॉलरच कर्ज, प्रत्येक नागरिकाच्या डोक्याव लाखोंच ऋण
नुकतीच झाली होती भारत-ऑस्ट्रेलिया चर्चा -
यापूर्वी भारत-ऑस्ट्रेलियातयही व्हर्च्युअल चर्चा झाली आहे. यावेळी दोन्ही देशांत एकूण 9 करारांवर स्वाक्षऱ्याही झाल्या होत्या. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी मोदींचे कौतुकही केले होते.