अरे देवा! महिला डॉक्टरने मित्रांना दिलं घोड्यांना कंट्रोल करण्याचं इंजेक्शन, महागात पडली नशेची सवय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 06:59 PM2021-11-24T18:59:58+5:302021-11-24T19:02:00+5:30
Lady Doctor Inject Horse tranquilliser to Friends : सध्या ऑस्ट्रेलियातील प्राण्यांची एक महिला डॉक्टर चर्चेत आहे. कारण या महिलेने स्वत:ला आणि तिच्या मित्रांना असं इंजेक्शन लावलं जे घोड्यांना दिलं जातं.
ज्या लोकांना नशेची सवय असते, ते लोक नशा करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. मग ते याचाही विचार करत नाहीत की, याचा आरोग्यावर किती परिणाम होईल. पण जेव्हा एक डॉक्टरच नशेच्या सवयीमुळे अशी चूक करत असेल तर चर्चा होईलच. सध्या ऑस्ट्रेलियातील (Australia) प्राण्यांची एक महिला डॉक्टर चर्चेत आहे. कारण या महिलेने स्वत:ला आणि तिच्या मित्रांना असं इंजेक्शन लावलं जे घोड्यांना दिलं जातं.
पश्चिम ऑस्ट्रेलियाची राहणारी कॅथरीन मॅक्गुइगॅन (Catherine McGuigan), एक पशुचिकित्सक आहे. ती मुर्रे व्हेटरनरी सर्व्हिसेसमध्ये काम करत होती. पण तिला नोकरीहून काढण्यात आलं. कॅथरीन आणि तिच्या मित्रांनी एक दिवस ड्रग्स घेऊन हाय होण्याचा प्लॅन केला होता. यासाठी ती तिच्या हॉस्पिटलमधून केटमाइन नावाच्या इंजेक्शनची बॉटल सोबत घेऊन गेली होती.
काय असतं हे केटामाइन?
केटामाइन ट्रॅक्युलायजर असतं जे घोड्यांना आणि इतरही प्राण्यांना दिलं जातं. जेणेकरून त्यांना शांत केलं जावं. मनुष्याला दिल्यावर हे इंजेक्शन तेच काम करतं, जे ड्रग्सची नशा केल्यावर मनुष्यासोबत होतं. डोकं सुन्न होतं आणि माणूस शांत होतो. हे एकप्रकारे प्राण्यांसाठी एनेस्थेशियासारखं काम करतं. ऑस्ट्रेलियात हे औषध नेहमीच लॉक करून ठेवण्याचा नियम आहे. हे बाजारात सहज विकताही येत नाही.
डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, यावर्षी ऑक्टोबरमध्ये कॅथरीन आणि तिचे मित्र कोकेनची नशा करत होते. तेव्हा कॅथरीन कारमधून केटामाइनची बॉटल घेऊन आली. त्यानंतर तिने मित्रांना ड्रग इंजेक्ट केलं आणि मित्रांना याबाबत कुणालाही काही न सांगण्यास बजावले. प्राण्यांची डॉक्टर असल्याने कॅथरीनकडे केटामाइन ठेवण्याचा अधिकार तर होता, पण ती याचा वापर मनुष्यांवर करू शकत नव्हती. आता मेडिकल क्षेत्राशी संबंधित एका चौकशी समितीने तिच्यावर २ लाखांपेक्षा रूपयांचा दंड ठोठावला आहे. इतकंच नाही तर तिचं डॉक्टरीचं लायसन्सही काढून घेतलं आहे. म्हणजे ती आता मेडिकल प्रॅक्टिस करू शकत नाही.