महिलेनं 55 लाखांची लॉटरी जिंकली, पण कॉल दुर्लक्षित करणं पडलं महागात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2022 06:05 PM2022-03-05T18:05:20+5:302022-03-05T18:12:14+5:30

Australian Woman Won Lottery : 55 लाखांचे बक्षीस जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियन महिलेने कॉलकडे दुर्लक्ष केले आणि तिने ही फसवणूक असल्याचे मानले.

australian woman won rs 55 lakh jackpot ignored lottery phone calls | महिलेनं 55 लाखांची लॉटरी जिंकली, पण कॉल दुर्लक्षित करणं पडलं महागात

महिलेनं 55 लाखांची लॉटरी जिंकली, पण कॉल दुर्लक्षित करणं पडलं महागात

Next

नवी दिल्ली : लॉटरीच्या नावाखाली फसवणुकीच्या प्रकारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. काही लोक त्यात अडकतात, तर काहीजण असे कॉल्स दुर्लक्षित करतात. अशातच बरेच लोक असेही असतात की जे लॉटरीची तिकीट खरेदी करतात आणि विसरतात. त्यांना शक्यतो आपण लॉटरी जिंकू, असा विश्वास नसतो. तरीही ते लॉटरी खरेदी करता. असेच काहीसे एका ऑस्ट्रेलियन महिलेसोबत (Australian Woman) घडले. या महिलेला लॉटरी लागल्यानंतर (Woman Won Lottery) फोन आला. मात्र त्या महिलेने फसवणुकीचा कॉल असल्याचे वाटले आणि कॉल रिसिव्ह केला नाही. त्यामुळे तिला 1 लाख ऑस्ट्रेलियन डॉलरला (भारतीय चलनात 50 लाख रुपये) मुकावे लागले आहे.  

55 लाखांचे बक्षीस जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियन महिलेने कॉलकडे दुर्लक्ष केले आणि तिने ही फसवणूक असल्याचे मानले. ऑस्ट्रेलियन महिला अनेकवेळा फोन कॉल्सकडे दुर्लक्ष करत राहिली आणि बऱ्याच दिवसांनी तिला 1 लाख ऑस्ट्रेलियन डॉलर्सची लॉटरी लागल्याचे समजले. ऑस्ट्रेलियातील फ्रेंच फॉरेस्ट ऑफ न्यू साउथ वेल्समधील एका महिलेने 25 फेब्रुवारी रोजी thelott.com वर लकी लॉटरीची तिकिटे खरेदी केली होती. मात्र लॉटरी काढल्यानंतर याबद्दल माहिती गोळा करण्यास ती विसरली. या संदर्भात महिलेला अनेक फोन आले, पण हा काही फसवणुकीचा प्रकार असल्याचे समजून तिने त्याकडे दुर्लक्ष केले. लॉटरी अधिकार्‍यांकडून आलेला फोन हा फसवणुकीचा प्रकार आहे, असा गैरसमज त्यांना सुरुवातीला अनेक दिवस होता. 

लॉटरी जिंकलेल्या महिलेने 'द लॉट'ला सांगितले की, सोडतीनंतर काही वेळातच तिला काही फोन कॉल्स आणि ईमेल आले होते. पण हा फसवणुकीचा प्रकार असल्याचा त्यांचा समज झाला. मात्र नक्की हे काय आहे, हे त्या ओळखू शकल्या नाही. त्यामुळे त्यांनी यासंदर्भात कोणतेही उत्तर दिले नाही किंवा कोणतीही दखल घेतली नाही. या महिलेने सांगितलं की, त्यांनी काही दिवस फोन कॉल्स आणि ईमेलकडे दुर्लक्ष केले. यानंतर त्यांनी शेवटी त्यांच्या ऑनलाइन द लॉट खात्यात लॉगइन करण्याचा निर्णय घेतला. त्या म्हणाल्या, लॉटरीच्या या वेबसाईटमध्ये लॉगइन केल्यावर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांना नंतर कळलं हे कॉल्स जे त्यांना येत होते, ते खरे होते. या महिलेला ही लॉटरीची रक्कम मिळाली असून ही रक्कम आता कशी खर्च करावी, याचा त्या विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले. 

Web Title: australian woman won rs 55 lakh jackpot ignored lottery phone calls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Automobileवाहन