ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ 'क्रिकेटर ऑफ दी इयर'

By Admin | Published: December 23, 2015 02:13 PM2015-12-23T14:13:31+5:302015-12-23T14:17:19+5:30

स्टिव्ह स्मिथची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून दिल्या जाणा-या प्रतिष्ठेच्या कसोटी क्रिकेटपटू आणि क्रिकेटर ऑफ दी इयर' पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

Australia's Steve Smith 'Cricketer of the Year' | ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ 'क्रिकेटर ऑफ दी इयर'

ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ 'क्रिकेटर ऑफ दी इयर'

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत 

दुबई, दि. २३ - ऑस्ट्रेलियाचा अव्वल फलंदाज आणि कर्णधार स्टिव्ह स्मिथची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून दिल्या जाणा-या प्रतिष्ठेच्या कसोटी क्रिकेटपटू आणि  'क्रिकेटर ऑफ दी इयर' पुरस्कारासाठी निवड झाली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या ए.बी.डिविलियर्सला २०१५ सालचा सर्वोत्कृष्ट वनडे प्लेयरचा पुरस्कार जाहीर झाला आहे.  

कसोटी क्रिकेटपटू आणि क्रिकेटर ऑफ दी इयर हे दोन्ही पुरस्कार एकाचवेळी मिळवणारा स्मिथ सातवा क्रिकेटपटू असल्याचे आयसीसीने  बुधवारी सांगितले. ऑस्ट्रेलियाच्या मायकल क्लार्कने २०१३ आणि ऑस्ट्रेलियाच्याच मिचेल जॉन्सनने २०१४ मध्ये एकाचवेळी हे दोन्ही प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळवले होते. 
स्मिथने १८ सप्टेंबर २०१४ ते १३ सप्टेंबर २०१५ या कालावधीत कसोटीमध्ये २५ डावात ८२.५७ च्या सरासरीने १,७३४ धावा केल्या. यात सात शतकांचा समावेश आहे. सलग दुस-यावर्षी डिविलियर्सने वनडे प्लेयरचा पुरस्कार मिळवला. त्याने २० सामन्यात १,२६५ धावा फटकावल्या. यात दोन शतके आणि नऊ अर्धशतकांचा समावेश आहे. 

Web Title: Australia's Steve Smith 'Cricketer of the Year'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.