ऑस्ट्रिया संसदेनं बुरख्यावर घातली बंदी

By admin | Published: May 18, 2017 12:52 PM2017-05-18T12:52:03+5:302017-05-18T12:52:03+5:30

ऑस्ट्रिया देशाच्या संसदेत मुस्लिमांच्या बुरखा परिधान करण्याला बंदी घालण्यात आली आहे.

Austrian parliament bans imposed ban | ऑस्ट्रिया संसदेनं बुरख्यावर घातली बंदी

ऑस्ट्रिया संसदेनं बुरख्यावर घातली बंदी

Next
>ऑनलाइन लोकमत
ऑस्ट्रिया, दि. 18 - ऑस्ट्रिया देशाच्या संसदेत मुस्लिमांच्या बुरखा परिधान करण्याला बंदी घालण्यात आली आहे. देशात वाढत्या मुस्लिमांची लोकसंख्या लक्षात घेता ऑस्ट्रिया या देशानं हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ऑक्टोबरपासून मुस्लिम लोकांना बुरखा परिधान न करता पूर्ण चेहरा दाखवावा लागणार आहे. मात्र तरीही बुरखा परिधान केला तर त्यांना 150 यूरोमध्ये दंड ठोठावण्यात येणार आहे.

ऑस्ट्रियातल्या आघाडी सरकारनं दूरगामी आणि इस्लामविरोधी स्वातंत्र्य चळवळीचा उदय टाळण्यासाठी जानेवारीमध्ये हा प्रस्ताव आणला होता. त्याला अखेर मंजुरी मिळाली आहे. फरीद हाफेज, साल्झबर्ग विद्यापीठाचे राजकीय शास्त्रज्ञ आणि द युरोपियन इस्लामोफोबिया अहवालाचे संपादकांच्या मते, बुरख्यावर बंदी ही मुस्लिमांवर निर्बंध लादण्यासाठी घालण्यात आली आहे. ऑस्ट्रियात 2015मध्ये 600,000 मुस्लिम लोकसंख्या होती. इमामांनी जर्मन बोलण्यास सक्षम असायला हवे, अशा विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. सार्वजनिकरीत्या एक शक्तिशाली देश बनण्याचे हे आणखी एक उदाहरण आहे.

मुस्लिम स्थलांतरितांना रोखून देशाची एकात्मता अबाधित ठेवण्यासाठी ऑस्ट्रिया सरकारनं हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. दरम्यान ऑस्ट्रियामध्ये जर्मन आणि नीतिमत्तेनुसार मानले जाणारे नैतिकता शिकण्यासाठी वर्गही घेतले जातात. फरीद हाफेज म्हणाले, ऑस्ट्रिया जाणूनबुजून स्थलांतरितांना लक्ष्य करीत आहे. इथे आलेल्या स्थलांतरितांचा परिचय होण्यासाठी ऑस्ट्रियानं बुरखा बंदी केली आहे. ऑस्ट्रिया हा यूरोपमधील असा देश आहे, ती ज्यानं आजपर्यंत श्रमिक बाजारांच्या तत्त्वात कधीच बदल केला नाही. प्रगती करण्यासाठी ऑस्ट्रिया देशाला सुधारणा करण्याची गरज असल्याचंही मतही फरीद हाफेज यांनी मांडलं आहे. 

Web Title: Austrian parliament bans imposed ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.