भयानक! उत्तर कोरियाच्या न्यूक्लिअर तळावरील दुर्घटनेत 200 जणांचा बळी, किरणोत्सर्गाचा धोका  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2017 06:58 PM2017-10-31T18:58:27+5:302017-10-31T20:45:14+5:30

उत्तर कोरियाच्या न्यूक्लियर तळावर झालेल्या दुर्घटनेमध्ये 200 जणांचा बळी गेला आहे.  उत्तर कोरियाच्या ईशान्य भागातीलन्यूक्लियर तळावर बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यात पडझड होऊन हा अपघात झाला.

Awesome! North Korea's nuclear-infestation catches up to 200 people, risks of radioactive radiation | भयानक! उत्तर कोरियाच्या न्यूक्लिअर तळावरील दुर्घटनेत 200 जणांचा बळी, किरणोत्सर्गाचा धोका  

भयानक! उत्तर कोरियाच्या न्यूक्लिअर तळावरील दुर्घटनेत 200 जणांचा बळी, किरणोत्सर्गाचा धोका  

Next

प्योंगयोंग - उत्तर कोरियाच्या न्यूक्लियर तळावर झालेल्या दुर्घटनेमध्ये 200 जणांचा बळी गेला आहे.  उत्तर कोरियाच्या ईशान्य भागातील न्यूक्लियर तळावर बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यात पडझड होऊन हा अपघात झाला. 10 ऑक्टोबरला झालेल्या या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात किरणोत्सर्ग होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच चेर्नोबिल आणि फुकुशिमा येथील दुर्घटनांप्रमाणे मोठ्या प्रमाणावर हानी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 
उत्तर कोरियाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार भूमिगत बोगद्याच्या बांधकामादरम्यान ही पडझड झाली. यामध्ये 100 लोक गाडले गेले. तर मदतकार्य सुरु असताना पुन्हा एकदा मोठा भाग कोसळला. यात अजून 100 लोकांचा मृत्यू झाला. दरम्यान, अणुचाचणीदरम्यान बसणाऱ्या हादऱ्यांमुळेच हा बोगदा कोसळल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 3 सप्टेंबरला उत्तर कोरियाने मोठी अणुचाचणी केली होती. त्यावेळी डोंगरदऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर भूस्स्खलनाच्या घटना घडल्या होत्या. तसेच या अणुचाचणीमुळे भूकंपाचे धक्केही जाणवले होते. या अपघाताचे वृत्त जपानी वृत्तसंस्थांनी दिले आहे. 
उत्तर कोरियाच्या न्यूक्लिअर प्रोग्राम आणि अणुबॉम्ब चाचणीमुळे आधीच  कोरियन द्विपकल्पात तणाव आहे. दुसरीकडे अमेरिकेकडूनही वारंवार आक्रमक भूमिका घेतली जात असून, धमक्या दिल्या जात आहेत. उत्तर कोरिया अमेरिकेसहित संपुर्ण जगाला अणुबॉम्बची भीती दाखवत आहे. एका रिपोर्टनुसार, जर उत्तर कोरियाने युद्ध पुकारलं, आणि अणुबॉम्ब शस्त्रांचा वापर केला नाही तरी लाखो लोकांचा मृत्यू होईल. परिस्थिती इतकी भयानक असेल की, पहिल्याच दिवशी तीन लाख लोकांचा मृत्यू होईल.  
अमेरिकी काँग्रेसच्या थिंक टँक काँग्रेसनल रिसर्च सर्व्हिसच्या रिपोर्टच्या हवाल्याने ब्लूमबर्गने होणा-या नुकसानाचा अंदाज लावला आहे. 62 पानांचा हा रिपोर्ट अमेरिकी खासदारांना पाठवण्यात आला आहे. या रिपोर्टनुसार, जर युद्ध झालं तर, कोरियन द्विपकल्पातील जवळपास अडीच कोटी लोक प्रभावित होतील. यामधील एक लाखांहून जास्त अमेरिकन नागरिकांचा समावेश असेल.  
रिपोर्टमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, उत्तर कोरियाने आपल्या पारंपारिक शस्त्रांचा वापर केल्यास पहिल्याच दिवशी 30 हजार ते तीन लाख लोक मारले जातील. रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, उत्तर कोरियाजवळ 10 हजार राऊंट प्रती सेकंद वेगाने फायरिंग करण्याची क्षमता आहे. तसंच एकदा युद्धाची घोषणा झाल्यास यामध्ये चीन, जपान आणि रशियाही उतरु शकतं असा अंदाज रिपोर्टमधून वर्तवण्यात आला आहे.  
अमेरिकेसाठी युद्ध खूपच नुकसान देणारं ठरु शकतं. रिपोर्टनुसार, युद्धासाठी मोठ्या संख्येने अमेरिकन सैनिक कोरियन द्विपकल्पात एकत्र येतील. अशा परिस्थिती मोठं लष्करी नुकसान होण्याची शक्यता आहे. शक्यता वर्तवण्यात येत आहे की, चीनदेखील युद्धात उडी घेऊ शकतं. युद्धाच्या छळा कोरियन द्विपकल्पाबाहेर जातील, ज्यामुळे होणारं नुकसान खूप मोठं असेल.   

Web Title: Awesome! North Korea's nuclear-infestation catches up to 200 people, risks of radioactive radiation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.