अजब ! इसीसच्या उदयासाठी टॉम अॅण्ड जेरी जबाबदार
By admin | Published: May 9, 2016 10:26 AM2016-05-09T10:26:54+5:302016-05-09T10:45:13+5:30
इजिप्तच्या राज्य माहिती सेवा प्रमुखांनी इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅण्ड सिरियाच्या (इसीस) उदयाला टॉम अॅण्ड जेरी कार्टून जबाबदार असल्याचा अजब शोध लावला आहे
Next
ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 09 - इजिप्तच्या राज्य माहिती सेवा प्रमुखांनी इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅण्ड सिरियाच्या (इसीस) उदयाला टॉम अॅण्ड जेरी कार्टून जबाबदार असल्याचा अजब शोध लावला आहे. 'मध्य पूर्व देशांमध्ये टॉम अॅण्ड जेरी कार्टूनमुळे हिंसा आणि दहशतवाद वाढत असल्याचं', इजिप्तचे राज्य माहिती सेवा प्रमुख सलाह अब्देल सादेक यांनी म्हटलं आहे.
कैरो विद्यापीठात बोलताना सलाह अब्देल सादेक यांनी हे वक्तव्य केलं आहे. 'टॉम अॅण्ड जेरी कार्टूनच्या माध्यमातून विनोदाद्वारे अवास्तव युद्ध दाखवलं जातं. यामधून तरुणांना हिंसेसाठी प्रवृत्त केलं जात आहे', असं सलाह अब्देल सादेक बोलले आहेत. सादेक यांनी कार्टूनसोबत व्हिडिओ गेम्स आणि हिंसक चित्रपटांनादेखील जबाबदार ठरवलं आहे.
इजिप्शिअन स्ट्रीट्सने यासंबंधी वृत्त दिलं आहे. 'व्हिडिओ गेम्स मोठ्या प्रमाणात खेळले जात आहेत अनेक तास व्हिडिओ गेम्स खेळत बसणे हे नित्यनियमाचे झालं आहे. या व्हिडिओ गेम्सच्या माध्यमातून हत्या करणं, रक्त सांडणं या गोष्टी सहज झाल्या आहेत, आणि याचा आनंदही त्यांना मिळत आहे', असं सादेक बोलले आहेत.
टॉम अॅण्ड जेरीबद्दल बोलताना सादेक यांनी 'कार्टूनमध्ये हिंसक वृत्ती तसंच हिंसा नैसर्गिक असल्याचं दाखवण्यात येत आहे', असा आरोप केला आहे. 'हिंसा विनोदी अंगाने दाखवली जात आहे ज्यामध्ये तुम्ही कोणालाही मारु शकता', असा संदेश दिला जात आहे असंही म्हटलं आहे.
Egypt's rulers must have been watching a lot of Tom and Jerry if this is the case https://t.co/LxfyrJIC2G
— Sarah Birke (@sarah_birke) May 4, 2016
Senior #Egypt Official Blames ‘Tom and Jerry’, Video #Games for Violence Across Middle East https://t.co/LJ7LiEGUh9pic.twitter.com/tumdxGBkAd
— Egyptian Streets (@EgyptianStreets) May 4, 2016
सादेक यांच्या वक्तव्यावर सोशल मिडियावरुन जोरदार टीका करण्यात आली आहे. याअगोदरही हिंसेसाठी टीव्ही आणि व्हिडिओ गेम्सना जबाबदार धरण्यात आले आहे. 2012 मध्ये अमेरिकेत झालेल्या गोळीबाराला नॅशनल रायफल असोसिएशनने हिंसक व्हिडिओ गेम्स जबाबदार असल्याचं सांगितलं होतं.