नारिंगी हिमवर्षावाचं अजब दृष्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 03:04 AM2018-03-28T03:04:34+5:302018-03-28T03:04:34+5:30
पर्वतराजींवर नारिंगी छटेच्या बर्फाच्या चादरींचं आच्छादन पसरल्याने या भागांना मंगळाच्या पृष्ठभागाचे स्वरूप आलं
रशिया, युक्रेन, बल्गेरिया, रोमानिया आणि पूर्व युरोपमधील काही देशांमध्ये गेले काही दिवस नारिंगी हिमवर्षावाचं अजब दृष्य पाहायला मिळत आहे. पर्वतराजींवर नारिंगी छटेच्या बर्फाच्या चादरींचं आच्छादन पसरल्याने या भागांना मंगळाच्या पृष्ठभागाचे स्वरूप आलं असून, त्याची मनोहारी छायाचित्रं उत्साही लोकांनी समाजमाध्यमांवर टाकली आहेत.
1जगभरातील स्कीर्इंगप्रेमींसाठी आवडतं ठिकाण असलेले रशियातील सोची हे शहर नारिंगी बर्फवृष्टीने नटलं असून ‘आम्ही मंगळावर स्कीर्इंग करीत आहोत’,
अशा टॅगलाइनसह एका पर्यटकानं तेथून टाकलेलं छायाचित्र नेटिझन्सचं लक्ष वेधून घेत आहे. संपूर्ण आसमंत नारिंगी बर्फावर चकाकणाऱ्या सूर्य किरणांमध्ये न्हाऊन निघाल्याची अशीच अनेक छायाचित्रं इन्स्टाग्राम, टिष्ट्वटर व फेसबूक आदी समाजमाध्यमांतून पाहायला मिळत आहेत.
2हवामानतज्ज्ञांनुसार अशी बर्फवृष्टी साधारणपणे दर पाच वर्षांनी पृथ्वीच्या काही भागांमध्ये होते. सन २००७ मध्ये सैबेरियाच्या तीन भागांमध्ये असेच नारिंगी रंगाचं
बर्फ पडले होतं. मात्र त्याला तेलकटपणा होता. त्यामुळे या घटनेकडे गूढ म्हणून पाहिलं गेलं होतं.
असं का होतं?
या हिमवृष्टीला नारिंगी रंगाची छटा कशी येते, याचा खुलासा ब्रिटिश हवामान खात्याचे अधिकारी स्टीव्हन कीट््स यांनी केला. ते म्हणाले की, सहारा व उत्तर आफ्रिकेतील अन्य विस्तीर्ण वाळवंटी प्रदेशात जेव्हा वाळुची वादळं होतात. त्यात वाळू आकाशात उधळली जाते. आकाशात उंच पातळीवर स्थिरावलेली वाळू वाºयांसोबत दूरपर्यंत वाहत जाते. अनुकूल हवामान मिळाल्यावर आकाशातील ही वाळू व धुलीकण पाऊस किंवा हिमवर्षावासोबत खाली येतात. याला गढूळ पाण्याचा बर्फ तयार केल्याप्रमाणे एक नारिंगी छटा येते. ही हिमवृष्टीचेही अशीच होते.