भारतीय तरुणांना इसिसमध्ये भरती होण्यास प्रवृत्त करणा-या आयशा हमीडॉन या महिलेस फिलिपीन्समधून केली अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 01:01 AM2017-10-22T01:01:44+5:302017-10-22T01:02:08+5:30
भारतीय तरुणांत कट्टरता रुजवून, त्यांनी इस्लामिक स्टेट (इसिस) मध्ये सहभागी व्हावे, यासाठी प्रोत्साहन देणा-या कारेन आयशा हमीडॉन या महिलेस फिलिपीन्समध्ये अटक करण्यात आली आहे.
मनिला : भारतीय तरुणांत कट्टरता रुजवून, त्यांनी इस्लामिक स्टेट (इसिस) मध्ये सहभागी व्हावे, यासाठी प्रोत्साहन देणा-या कारेन आयशा हमीडॉन या महिलेस फिलिपीन्समध्ये अटक करण्यात आली आहे.
एनबीआयच्या पथकाने मनिला येथील घरातून कारेन आयशाला अटक केली. कारेन आयशा भारतीय वंशाची आहे. भारत व अन्य देशांतील तरुणांनी इसिसमध्ये सहभागी व्हावे, यासाठी ती आॅनलाइन प्रचारात महत्त्वाची भूमिका बजावत होती. आयशा हमीडॉनचा पती मोहम्मद जाफर माकवीद फिलिपीन्समधील दहशतवादी कृत्यांत सहभागी झाला होता. त्याच्या मृत्यूनंतर आयशा इसिसाठी काम करीत होती. भारतीय तपास यंत्रणेला गेल्या वर्षी आयशाच्या आॅनलाइन कारवायांची माहिती मिळाली. त्यानंतर भारताने अन्य देशांनाही तिच्या कारवायांची माहिती दिली. विविध सोशल मीडियाचा वापर करून ती भारतीय तसेच अन्य देशातील तरुणांची माथी भडकवत होती. (वृत्तसंस्था)