Al Qaeda New Chief: कोण होणार अल कायदाचा नवीन म्होरक्या? जवाहिरीच्या मृत्यूनंतर 'या' नावाची जोरदार चर्चा...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2022 12:27 PM2022-08-02T12:27:34+5:302022-08-02T12:29:54+5:30
Ayman al Zawahiri Killing: 9/11 हल्ल्यातील दहशतवादी आणि अल कायदाचा प्रमुख अयमान अल जवाहिरीला अमेरिकेने ठार केले आहे.
Al Qaeda New Chief Name: अमेरिकेने अलकायदाचा (Al Qaeda) म्होरक्या आयमन अल-जवाहिरीचा (Ayman al-Zawahiri) खात्मा केला आहे. केंद्रीय गुप्तचर संस्थेने (CIA) अफगानिस्तानमध्ये ड्रोन हल्ला करून जवाहिरीला ठार केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनीच जवाहिरीचा खात्मा केल्याची पुष्टी केली आहे. 11 सप्टेंबर, 2001 रोजी अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या हल्ल्यात जवाहिरीचा हात होता.
9/11 हल्ल्यात सहभाग
ओसामा बिन लादेन (Osama Bin Laden) सोबत मिळून जवाहिरीने वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला करण्याचा कट रचला होता. त्याने हल्ल्यासाठी चार विमाने हायजॅक करण्यास मदत केली होती. यापैकी 2 विमाने वर्ल्ड ट्रेड सेंटरवर, तिसरे पेंटागॉनवर आण चौथे विमान एका शेतात क्रॅश झाले होते. या घटनेत जवळपास 3,000 लोकांचा मृत्यू झाला होता. अयमान अल जवाहिरीच्या मृत्यूनंतर आता अल कायदा(Al Qaeda)चे प्रमुख पद रिकामे झाले आहे. त्यामुळे अल कायदाचा प्रमुख कोण होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या व्यक्तीच्या नावावर चर्चा..
डेली मेलमध्ये छापून आलेल्या एका रिपोर्टनुसार, सैफ अल आदिल (Saif al-Adel) याची अल कायदाचा प्रमुख म्हणून निवड होऊ शकते, अशी चर्चा आहे. सैफ अल आदिल इजिप्तच्या आर्मीमध्ये अधिकारी होता. याशिवाय, तो अल कायदाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहे. अल कायदापूर्वी 1980 मध्ये तो दहशतवादी संघटना मकतब-अल-खिदमतमध्य होता.
आतंकी सैफ अल आदिल की भूमिका अहम
सैफ अल आदिल 30 वर्षांचा असताना त्याने सोमालियाच्या मोगादिशुमध्ये 'ब्लॅक हॉक डाउन' ऑपरेशनचे नेतृत्व केले होते. त्यात 19 अमेरिकन सैनिक ठार झाले होते. ओसामा बिन लादेनच्या मृत्यूनंतर एक रणनीतिकार म्हणून सैफ अल आदिलची भूमिका महत्वाची राहिली आहे. परंतू, सध्या आदिल कुठे आहे, याची माहिती नाही? काही मीडिया रिपोर्टनुसार, तो गेल्या 19 वर्षांपासून इरानमध्ये अडकून पडला आहे.