मोठी बातमी! रशिया -गोवा विमान उडवून देण्याची धमकी; २३८ प्रवाशांचा जीव धोक्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2023 11:51 AM2023-01-21T11:51:49+5:302023-01-21T11:54:32+5:30
रशियाहून गोव्यात येणाऱ्या चार्टर्ड विमानाला सुरक्षा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. विमान उझबेकिस्तानला वळवण्यात आले आहे. या विमानात 2 लहान मुले आणि 7 क्रू मेंबर्स असे एकूण 238 जण प्रवास करत आहेत.
रशियाहून गोव्यात येणाऱ्या चार्टर्ड विमानाला सुरक्षा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. विमान उझबेकिस्तानला वळवण्यात आले आहे. या विमानात 2 लहान मुले आणि 7 क्रू मेंबर्स असे एकूण 238 जण प्रवास करत आहेत. गोव्यात येण्यासाठी अजूर एअरलाइन्सच्या विमानाने रशियाच्या पेराम आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानाने उड्डाण केले. पण मध्येच त्याला सुरक्षेशी संबंधित अलर्ट जारी करण्यात आला.
अलर्टनंतर हे विमान उझबेकिस्तानकडे वळवण्यात आले आहे. 11 दिवसांत रशियन एअरलाइन्सच्या Azure च्या उड्डाणाची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी 9 जानेवारीच्या रात्री उशिरा मॉस्कोहून गोव्याला जाणाऱ्या अझूर एअरलाइन्सच्या विमानाचे गुजरातमधील जामनगर येथे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले होते. विमानात बॉम्ब असल्याची बातमी गोव्याच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलला ई-मेलद्वारे मिळाली होती. ई-मेल गांभीर्याने घेत गोवा एअर ट्रॅफिक कंट्रोलने तातडीने विमानाच्या पायलटशी संपर्क साधला आणि त्याला जवळच्या विमानतळावर विमान उतरवण्यास सांगितले आहे.
भारतानेच माझ्याबद्दल अफवा पसरवल्या- अब्दुल रहमान मक्की
त्यानंतर एटीसीने विमानाच्या पायलटला जामनगर येथील भारतीय हवाई दलाच्या हवाई तळावर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्याचे निर्देश दिले. या विमानतळावरून फक्त एकच प्रवासी विमान चालते आणि तेही सकाळी. मिळालेल्या माहितीनुसार, या विमानाने 9 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता मॉस्कोहून गोव्यासाठी उड्डाण केले होते. या विमानात 236 प्रवाशांसह एकूण 244 लोक होते. ज्यामध्ये 8 क्रू मेंबर्सचाही समावेश आहे. मात्र, तपासणीत फ्लाइटमध्ये काहीही संशयास्पद आढळले नाही. त्यानंतर विमान गोव्याला रवाना झाले.
Goa-bound chartered flight from Russian capital Moscow with 240 passengers on board diverted to Uzbekistan in early hours of Saturday following bomb threat: Police
— Press Trust of India (@PTI_News) January 21, 2023
सिंगापूरहून मुंबईला जाणाऱ्या विस्तारा विमानाला तांत्रिक बिघाडामुळे सिंगापूरच्या चांगी विमानतळावर उतरावे लागले. बुधवार, 18 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता विमानाने उड्डाण घेतल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र तांत्रिक बिघाडामुळे वैमानिकांनी विमान सिंगापूरला परत मिळवले. विमानात उपस्थित असलेल्या सर्व प्रवाशांना विमान कंपनीने काही सुविधा दिल्या आहेत. या सुविधेत काही प्रवाशांना दुसऱ्या विमानाने त्यांच्या इच्छित स्थळी नेण्यात आले, तर काही विलंबामुळे विविध प्रकारचे व्हाउचर देण्यात आले आहेत.