लंडनमध्ये लागला बाबा बागेश्वर यांचा दरबार, तरुणीनं सर्वांसमोर दिलं ओपन चॅलेन्ज अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 05:42 PM2023-07-25T17:42:32+5:302023-07-25T17:53:40+5:30

बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांचा 22 ते 28 जुलैपर्यंत लंडनमध्ये दरबार आहे. त्यांचे प्रवचन ऐकण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणावर येत आहेत. विशेष म्हणजे, याकार्यक्रमाचे आयोजन ज्या ठिकाणी केले आहे, तेथे जागाही कमी पडत आहे.

baba bageshwar in london the girl gave an open challenge | लंडनमध्ये लागला बाबा बागेश्वर यांचा दरबार, तरुणीनं सर्वांसमोर दिलं ओपन चॅलेन्ज अन्...

लंडनमध्ये लागला बाबा बागेश्वर यांचा दरबार, तरुणीनं सर्वांसमोर दिलं ओपन चॅलेन्ज अन्...

googlenewsNext


बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र शास्त्री यांचा दरबार सध्या लंडनमध्ये सुरू आहे. लीसेस्टर भागात धीरेंद्र शास्त्री यांच्या दरबारात हजारो लोक येत आहेत. अगदी भारता प्रमाणेच दृष्य लंडनमध्येही बघायला मिळत आहे. यातच, येथे दरबारात पोहोचलेल्या एका तरुणीने बागेश्वर शास्त्री यांना खुले चॅलेन्ज दिले होते. 

ही तरुणी धीरेंद्र शास्त्री यांना म्हणाली, आपल्या दरबारात सर्व काही सेटिंगने चालते आणि येते एन्ट्री मिळवणेही सोपे नाही. मात्र यावेळी धीरेंद्र शास्त्री यांनीही असे काही उत्तर दिले की, सर्वच आश्चर्य चकित झाले. ते तरुणीला म्हणाले, आपल्याला ज्याला कुणाला येथे घेऊन यायचे आहे या, येथे कागदावर त्याच व्यक्तीचे नाव निघेल. जे मी येथे आधीच लिहून ठेवेन.

धीरेंद्र शास्त्री यांच्या म्हणण्यावर त्या तरुणीने एकाला उभे केले. त्या व्यक्तीसंदर्भात त्यांनी सर्वकाही सांगितले, जे आधीच कागदावर लिहून ठेवलेले होते. बाबा धीरेंद्र शास्त्री यांची ही कमाल बघून सर्वांनाचच आश्चर्य वाटले. 

बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांचा 22 ते 28 जुलैपर्यंत लंडनमध्ये दरबार आहे. त्यांचे प्रवचन ऐकण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणावर येत आहेत. विशेष म्हणजे, याकार्यक्रमाचे आयोजन ज्या ठिकाणी केले आहे, तेथे जागाही कमी पडत आहे. यावेळी धीरेंद्र शास्त्री म्हणाले, जेवढा हॉल आहे, तेवढा संपूर्ण भरला आहे. येथील नियम स्ट्रिक्ट आहेत. भारतात आम्ही लोकांना झाडांवरही बसवतो. 

Web Title: baba bageshwar in london the girl gave an open challenge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.