Baba Ramdev Patanjali: बाबा रामदेव यांच्या कंपनीला दणका! पतंजलीची उत्पादने बनवणाऱ्या Divya Pharmacy ला 'या' देशाने केलं ब्लॅकलिस्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 11:38 PM2022-12-20T23:38:01+5:302022-12-20T23:39:02+5:30

दिव्या फार्मसीसह आणखी १६ कंपन्यांच्या उत्पादनांना धक्का

baba ramdev divya pharmacy Patanjali products blacklisted here the reason why decision taken | Baba Ramdev Patanjali: बाबा रामदेव यांच्या कंपनीला दणका! पतंजलीची उत्पादने बनवणाऱ्या Divya Pharmacy ला 'या' देशाने केलं ब्लॅकलिस्ट!

Baba Ramdev Patanjali: बाबा रामदेव यांच्या कंपनीला दणका! पतंजलीची उत्पादने बनवणाऱ्या Divya Pharmacy ला 'या' देशाने केलं ब्लॅकलिस्ट!

googlenewsNext

Baba Ramdev Patanjali: पतंजलीची सर्व उत्पादने बनवणाऱ्या बाबा रामदेव यांच्या दिव्या फार्मसीला एक मोठा धक्का बसला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणजेच World Health Organistion (WHO) मानकांची पूर्तता न केल्यामुळे नेपाळ या देशाने दिव्या फार्मसीला (Divya Pharmacy) काळ्या यादीत (Black List) टाकले आहे. हे कठोर पाऊल केवळ दिव्या फार्मसीच्या बाबतीच नव्हे तर १६ भारतीय औषध कंपन्यांविरुद्ध उचलण्यात आले आहे. नेपाळच्या औषध नियामक प्राधिकरणाच्या या निर्णयानंतर देशातील पतंजली उत्पादनांच्या निर्मितीवर मोठे संकट निर्माण झाले आहे.

दिव्या फार्मसीसह १६ कंपन्यांना दणका

दिव्या फार्मसीसोबतच नेपाळमध्ये काळ्या यादीत टाकलेल्या १६ भारतीय औषध कंपन्यांसाठीही मोठी समस्या निर्माण झाली आहे. पतंजलीसह सर्व १६ भारतीय फार्मास्युटिकल कंपन्या जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) औषध उत्पादन मानकांची पूर्तता करू शकलेल्या नाहीत. औषध प्रशासन विभागाने १८ डिसेंबर रोजी नोटीस बजावून नेपाळला या औषधांचा पुरवठा करणाऱ्या स्थानिक एजंटला कडक सूचना दिल्या आहेत. त्यांना या कंपन्यांची सर्व उत्पादने तातडीने मागे घेण्यास सांगण्यात आले आहे.

विभागाने जारी केलेल्या नोटीशीनुसार, सूचीबद्ध कंपन्यांनी उत्पादित केलेली औषधे नेपाळमध्ये आयात किंवा वितरित केली जाऊ शकत नाहीत. विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, नेपाळमध्ये त्यांची उत्पादने निर्यात करण्यासाठी अर्ज केलेल्या औषध कंपन्यांच्या उत्पादन सुविधांच्या तपासणीनंतर WHO मानकांचे पालन न करणाऱ्या कंपन्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. एप्रिल आणि जुलैमध्ये, विभागाने नेपाळला त्यांची उत्पादने पुरवण्यासाठी अर्ज केलेल्या फार्मास्युटिकल कंपन्यांच्या उत्पादन सुविधांची तपासणी करण्यासाठी औषध निरीक्षकांची एक टीम भारतात पाठवली. त्यानंतर ही यादी तयार करण्यात आल्याची माहिती आहे.

कोणत्या १६ कंपन्यांना धक्का?

दिव्या फार्मसी व्यतिरिक्त, या यादीमध्ये रेडियंट पॅरेंटेरल्स लिमिटेड, मर्क्युरी लॅबोरेटरीज लिमिटेड, अलायन्स बायोटेक, कॅप्टाब बायोटेक, एग्लोमेड लिमिटेड, झी लॅबोरेटरीज, डॅफोडिल्स फार्मास्युटिकल्स, जीएलएस फार्मा, युनिज्युल्स लाइफ सायन्स, कॉन्सेप्ट फार्मास्युटिकल्स, श्री आनंद लाइफ सायन्सेस, आयपीसीए लॅबोरेटरीज यांचा समावेश आहे. कॅडिला हेल्थकेअर लिमिटेड, डायल फार्मास्युटिकल्स आणि मॅकूर लॅबोरेटरीज यांचा समावेश आहे.

त्याचप्रमाणे, १९ डिसेंबर रोजी जारी केलेल्या दुसर्‍या नोटीसमध्ये विभागाने वितरकांना भारतस्थित कंपनी ग्लोबल हेल्थकेअरने निर्मित ५०० मिली आणि ५ लिटर हँड सॅनिटायझर परत मागवण्यास सांगितले. विभागाने संबंधित संस्थांना हँड सॅनिटायझरचा वापर, विक्री किंवा वितरण करू नये असे सांगितले आहे.

Web Title: baba ramdev divya pharmacy Patanjali products blacklisted here the reason why decision taken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.