बाबा वेंगा आणि नॉस्ट्रॅडॅमसची 2025 साठीची भविष्यवाणी, दिला मोठा इशारा!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 04:28 PM2024-10-22T16:28:15+5:302024-10-22T16:30:16+5:30
या दोघांनी, 2025 हे सामूहिक विनाशाचे वर्ष ठरेल असे भाकीत वर्तवले आहे...
नॉस्ट्रॅडॅमस (Nostradamus) आणि बाबा वेंगा (Baba Vanga) यांची बाकीतं बऱ्याचदा अचूक मानली जातात, कारण त्यांनी शेकडो वर्षांपूर्वी केलेली अनेक भाकीतं सत्य सिद्ध झाले आहेत. आता, 2025 संदर्भातील त्यांचे भाकीत पुन्हा एकदा इंटरनेटवर चर्चेचा विषय बनले आहेत. या दोघांनी, 2025 हे सामूहिक विनाशाचे वर्ष ठरेल असे भाकीत वर्तवले आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, फ्रेंच ज्योतिषी नॉस्ट्रॅडॅमस यांनी भाकीत केले होते की, 2025 मध्ये युरोपात मोठा विनाश होईल आणि युरोपातील मध्यवर्ती भागाला लक्ष केले जाईल. याचप्रमाणे, बल्गेरियन बाबा वेंगा यांनीही विनाशकारी युद्धाचा इशारा दिला होता.
नॉस्ट्रॅडॅमसचा मृत्यू 1566 मध्ये झाला. त्यांच्या 450 वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या 'लेस प्रोफेसीज' या पुस्तकात त्यांनी आपल्या भाकितांची नोंद केली आहे. या पुस्तकात त्यांनी अनेक घटनांची भाकीतं वर्तवली आहेत. यात, हिटलरची हुकूमशाही, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांची हत्या, महामारीचा उद्रेक, युरोपातील लोकांना एका भयंकर युद्धाला सामोरे जावे लागेल, तसेच, युद्धापेक्षाही भयंकर महामारी पसरेल आदी भाकितांचा समावेश आहे.
मोठ्या प्रमाणावर विनाश -
बाबा वेंगा यांनीही अशीच काही भाकीत वर्तवली आहेत. त्यांनी म्हटले आहे की, 2025 मध्ये मोठ्या प्रमाणावर विनाश होईल, ते जगासाठी संकटाचे वर्ष असेल. याशिवाय, 2025 मध्ये पृथ्वीवर अतिरिक्त-प्राण्यांची उपस्थिती आणि टेलिपॅथीचा विकास दिसून येईल.
नॉस्ट्रॅडॅमसच्या भाकितांमध्ये एक आनंदाची बातमीही आहे. ती म्हणजे, सध्या सुरू असलेले रशिया-युक्रेन युद्ध संपेल, कारण दोन्ही सैन्य थकेल. याशिवाय, ब्राझीलमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक आणि विनाशकारी पूराचे भाकीतही त्यांनी वर्तवले आहेत.
याच प्रमाणे, बाबा वेंगा यांनीही 2025 मध्ये युरोपात एक भीषण संघर्ष निर्माण होऊन युरोपातील लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर कमी होईल, असेही भाकीत वर्तवले आहे.