उपचार केल्यास २२ आठवड्यांचे बाळही जगू शकते

By admin | Published: May 8, 2015 01:09 AM2015-05-08T01:09:42+5:302015-05-08T04:59:15+5:30

: गर्भधारणेचा कालावधी पूर्ण न करता जन्माला येणाऱ्या अपुऱ्या दिवसाच्या मुलामधील अगदी लवकर जन्मलेली म्हणजेच २२ आठवडे वय

Babies can survive 22 weeks of treatment | उपचार केल्यास २२ आठवड्यांचे बाळही जगू शकते

उपचार केल्यास २२ आठवड्यांचे बाळही जगू शकते

Next

वॉशिंग्टन : गर्भधारणेचा कालावधी पूर्ण न करता जन्माला येणाऱ्या अपुऱ्या दिवसाच्या मुलामधील अगदी लवकर जन्मलेली म्हणजेच २२ आठवडे वय असणारी मुलेही अतिदक्षता कक्षात योग्य ते उपचार मिळाल्यास जगू शकतात असा नव्या संशोधनाचा निष्कर्ष असून यामुळे गर्भपाताच्या नियमाबद्दल वाद निर्माण झाला आहे.
या संशोधनाचे निष्कर्ष न्यू इंग्लंड जर्नल आॅफ मेडिसिनमध्ये प्रसिद्ध झाले असून, बालरोगशास्त्रासाठी हे संशोधन अत्यंत महत्त्वाचे आहे; पण त्याचबरोबर पालक, डॉक्टर आणि संसद सदस्य यांच्यासाठीही ते फार महत्त्वाचे ठरणार आहे, कारण गर्भाची टिकण्याची क्षमता असणारे वय लक्षात घेऊन गर्भपाताचा नियम ठरविण्यात आला आहे. त्या नियमाला धक्का बसणारे हे संशोधन आहे.
गर्भधारणेचा पूर्ण कालावधी ४० आठवड्यांचा असतो आणि बहुतांश मुले तो पूर्ण झाल्यानंतरच जन्माला येतात. २४ आठवड्यांआधीचे मूल जगू शकत नाही असे मानले जाते. या संशोधकांनी २७ आठवड्यांपूर्वी जन्मलेल्या ५ हजार बाळांचा अभ्यास केला.
लंडनमधील युनिव्हर्सिटी कॉलेजमधील नवजात अर्भक तज्ज्ञ नील मार्लो यांच्या म्हणण्यानुसार २२ आठवड्यांचे मूल जगण्याची शक्यता फारच कमी असल्याने त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्याची काळजी घेतली जात नसे; पण नव्या संशोधनानुसार अशी बाळे न जगण्याचे मुख्य कारण डॉक्टर हे असून, डॉक्टरांनी त्याला वाचविण्याचे कष्ट न घेतल्यामुळे अशी मुले मृत्यूच्या दारात लोटली जातात. आयोवा विद्यापीठातील बालरोगचिकित्सक व या संशोधनाचे सहसंशोधक एडवर्ड बेल यांनी न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या माहितीनुसार २२ आठवडे हा मूल जगण्याचा कालावधी मानला जावा. या वयातील मूल गर्भाशयाबाहेर उपचार दिल्यास जगू शकते.
 

 

Web Title: Babies can survive 22 weeks of treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.