निष्काळजीपणा लेकाच्या जीवावर बेतला; आईच्या एका केसामुळे 5 महिन्यांच्या बाळाची भयंकर अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 10:28 AM2022-02-10T10:28:32+5:302022-02-10T10:29:32+5:30

आईच्या एका केसामुळे 5 महिन्यांच्या बाळाची भयंकर अवस्था झाली आहे. त्याला पाय गमवावा लागला असता.

baby almost lost toe after mothers hair wrapped in leg | निष्काळजीपणा लेकाच्या जीवावर बेतला; आईच्या एका केसामुळे 5 महिन्यांच्या बाळाची भयंकर अवस्था

निष्काळजीपणा लेकाच्या जीवावर बेतला; आईच्या एका केसामुळे 5 महिन्यांच्या बाळाची भयंकर अवस्था

Next

प्रत्येक आई आपल्या मुलाची खूप काळजी घेते. त्याच्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देते. मात्र आता निष्काळजीपणा लेकाच्या जीवावर बेतल्याची एक घटना समोर आली आहे. आईच्या एका केसामुळे 5 महिन्यांच्या बाळाची भयंकर अवस्था झाली आहे. त्याला पाय गमवावा लागला असता. यूकेमध्ये राहणाऱ्या एका महिलेने तिचे गळणारे केस मुलासाठी कसे धोकादायक ठरले ते सांगितलं आहे. सारा असं या महिलेचं नाव असून तिचं पाच महिन्यांचं बाळ लोगन याचा पाय अचानक सूजू लागला. आपल्या बाळासोबत असं अचानक का होतं आहे ते तिला समजत नव्हतं. 

साराने लेकाचा पाय नीट तपासला तेव्हा तिला त्याच्या पायाच्या बोटांमध्ये रॅशसारखं काहीतरी दिसलं पण त्यात तिला काही खास दिसलं नाही. पण काही दिवसांतच लोगनचा पाय सुजू लागला. पण नंतर बाळाची अवस्था पाहून तिला चिंता वाटू लागली. तिने त्याला घेऊन डॉक्टरांकडे धाव घेतली. डॉक्टरांनी तिथं जे दाखवलं ते पाहून सर्वजण हैराण झाले. लोगनच्या पायातील एका बोटात एक केस अडकला होता. हा केस त्या बोटांभोवती गुंडाळेला होता. ज्यामुळे त्याच्या बोटातून रक्तप्रवाह होत नव्हता. यामुळेच त्याचं बोट लाल झालं होतं आणि सूजलं होतं. डॉक्टरांनी त्याला हेअर टुनिकेट सिंड्रोम असं म्हटलं. साराच्या मते, तिचा एक केस लोगनच्या बोटात अडकला असावा.

"बोटातील पूर्ण केस बाहेर येऊ शकला नाही"

डॉक्टरांनी चिमट्याने बोटातील केस काढण्याचा प्रयत्न केला, पण यामुळे केसाचा फक्त एक तुकडाच निघाला, तब्बल 40 मिनिटं डॉक्टरांनी प्रयत्न केलं पण त्याच्या बोटातील पूर्ण केस बाहेर येऊ शकला नाही. सारा लोगनला घरी घेऊन आली तेव्हा त्याचा पाय निळा पडू लागला. डॉक्टरांनी चिमट्याने केस काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो केस बाळाच्या बोटात आणखी घट्ट झाला आणि त्यामुळे त्याचा रक्तप्रवाह पूर्णपणे ब्लॉक झाला. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. लोगनचं बोट कापण्याशिवाय डॉक्टरांना दुसरा कोणताच पर्याय दिसत नव्हता.

"डॉक्टरांनी रात्रभर प्रयत्न केले आणि अखेर बोटातील केस काढण्यात यश"

डॉक्टरांनी रात्रभर प्रयत्न केले आणि अखेर त्याच्या पायाच्या बोटातील केस काढण्यात त्यांना यश मिळालं. आपल्या एका केसामुळे आपल्या बाळाला इतका त्रास होतो आहे, यामुळे सारा हैराण झाली होती. त्यामुळे आता इतर पालकांना जागरूक करण्यासाठी तिने सोशल मीडियावर हे प्रकरण शेअर केलं आहे. आईने आपल्या बाळाच्या शरीरापासून आपले केस दूरच ठेवावे नाहीतर ते बाळासाठी जीवघेणे ठरतील, असा सल्लाही तिने मातांना दिला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: baby almost lost toe after mothers hair wrapped in leg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :doctorडॉक्टर