धक्कादायक! येथे मुलींना जबरदस्तीनं केलं जात प्रेग्नंट; स्वैरपणे सुरू आहे 'बेबी फार्मिंग'! पीडितेनं सांगितली आपबिती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 01:52 PM2022-01-10T13:52:31+5:302022-01-10T13:52:56+5:30
एका पीडित तरुणीने सांगितले की, तिला कामाच्या बहाण्याने तिच्या गावातून आणले गेले. यानंतर तिच्यावर अनेकांनी बलात्कार केला. मग...
अबूजा - जगभरात अनेक बेकायदेशीर आणि अनैतिक कामे केली जातात. पण, आपण याची कल्पना तरी करू शकता का, की जगाच्या एका कोपऱ्यात चक्क 'बेबी फार्मिंग' (Baby Farming) केली जात असेल. होय, हे खरे आहे. आफ्रिका खंडातील (Africa) नायजेरियामध्ये (Nigeria) बेकायदेशीरपणे बेबी फार्मिंग केले जाते. धक्कादायक गोष्ट म्हणजे, येथे तरुणींना बळजबरीने प्रेग्नंट केले जाते आणि नंतर त्यांच्यापासून जन्माला येणाऱ्या बाळाची विक्री केली जाते. याहूनही धक्कादायक गोष्ट म्हणजे, येथे बाळांना जन्माला घालण्यासाठी प्रामुख्याने अल्पवयीन मुलींना निवडले जाते.
बेबी फार्मिंगचा अवैध व्यापार -
Alzajeera ने दिलेल्या एका वृत्तानुसार, नायजेरियाच्या दक्षिण-पूर्व भागात बेबी फार्मिंगचा हा अवैध धंदा मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. येथे मानव तस्कर बेबी फार्मिंगसाठी एक तर तरुणींचे अपहरण करतात अथवा त्यांना नोकरी देण्याच्या बहाण्याने आपल्या जाळ्यात अडकवतात.
पीडित तरुणीने ऐकवली तिची कहाणी-
एका पीडित तरुणीने सांगितले की, तिला कामाच्या बहाण्याने तिच्या गावातून आणले गेले. यानंतर तिच्यावर अनेकांनी बलात्कार केला. गर्भवती राहिल्यानंतरही तिच्यावर अनेकदा बलात्कार झाला. तिला एका कमी प्रकाश असलेल्या खोलीत ठेवण्यात आले होते. तिने अनेकवेळा पळून जाण्याचाही विचार केला, पण घराबाहेर गार्डची नजर असल्याने ती पळून जाऊ शकली नाही. बलात्कार करताना संबंधित तरुणी 6 आठवड्यांची गर्भवती आहे, की 6 महिन्यांपासून, याचा त्यांना काहीही फरक पडत नही.
मेल बेबीची किंमत असते अधिक -
पीडितेने सांगितले की, आमचे मूल किती रुपयांना विकले गेले, याची माहिती आम्हाला नसते. पण बाळ मुलगा असेल तर त्याची किंमत अधिक असते. एका मेल बेबी 2 हजार डॉलर्स म्हणजेच सुमारे 1 लाख 48 हजार 352 रुपयांना विकले जाते. तर फिमेल बेली 1350 डॉलर म्हणजेच सुमारे 1 लाख रुपयांना विकले जाते. एका रिपोर्ट नुसार, मानव तस्करांकडून प्रामुख्याने 14 ते 17 वर्षांच्या मुलींना टारगेट केले जाते.