जिवाणू रोखू शकतात अस्थमा

By Admin | Published: October 1, 2015 10:28 PM2015-10-01T22:28:38+5:302015-10-01T22:28:38+5:30

प्राथमिक अवस्थेतील अस्थमा बॅक्टेरिया रोखू शकतात. विशेषत: लहान मुलांमध्ये आढळून येणारा अस्थमा बॅक्टेरिया (जिवाणू) रोखू शकतात

Bacteria can prevent asthma | जिवाणू रोखू शकतात अस्थमा

जिवाणू रोखू शकतात अस्थमा

googlenewsNext

टोरांटो : प्राथमिक अवस्थेतील अस्थमा बॅक्टेरिया रोखू शकतात. विशेषत: लहान मुलांमध्ये आढळून येणारा अस्थमा बॅक्टेरिया (जिवाणू) रोखू शकतात, असा दावा कॅनडातील संशोधकांनी केला आहे.
इंग्लंडमध्ये तर दर ११ मुलांमागे एक मुलगा अस्थमाने ग्रस्त आहे. योग्य वेळी योग्य उपचाराने अस्थमावर नियंत्रण मिळविणे शक्य असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. युनिव्हर्सिटी आॅफ ब्रिटिश कोलंबियाच्या एका टीमने आणि एका चिल्ड्रन हॉस्पिटलने केलेल्या संशोधनानुसार मुलांमध्ये तीन वर्षांपर्यंत अस्थमाचा धोका अधिक असतो. संशोधकांपैकी एक असलेले डॉ. स्टुअर्ट तुर्व्ही म्हणतात की, अस्थमा रोखण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. प्राथमिक अवस्थेत अस्थमा रोखला जाऊ शकतो. तथापि, या बॅक्टेरियाबाबत अद्यापही आपणाला खूप कमी माहिती आहे. इंग्लंडमधील संशोधक डॉ. समंथा वॉकर म्हणतात की, अस्थमा एक गुंतागुंतीची समस्या आहे. यावर अधिक संशोधनाची गरज आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Bacteria can prevent asthma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.