बगदादमध्ये दोन बॉम्बहल्ले ११९ ठार, १३० जखमी
By admin | Published: July 4, 2016 05:55 AM2016-07-04T05:55:04+5:302016-07-04T05:55:04+5:30
बगदाद शहरात रविवारी झालेल्या दोन बॉम्बहल्ल्यांत ८३ जण ठार, तर १७६ जण जखमी झाले.
बगदाद : बगदाद शहरात रविवारी झालेल्या दोन बॉम्बहल्ल्यांत ८३ जण ठार, तर १७६ जण जखमी झाले. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अत्यंत वर्दळीच्या येथील कराडा नावाच्या व्यापारी पेठेत कारबॉम्बने हल्ला करण्यात आला. त्यात ११९ ठार, तर १३० जण जखमी झाले. रमजान महिन्याचा उपवास सोडून अनेक कुटुंबे आणि तरुण मुले रस्त्यावर आली होती.
तेव्हा हा हल्ला झाला. मृतांमध्ये बहुतांश तरुणांचा समावेश आहे. इस्लामिक स्टेटने या हल्ल्याची जबाबदारी आॅनलाइन पोस्ट केलेल्या निवेदनाद्वारे घेतली. आम्ही शिया मुस्लिमांना मुद्दाम लक्ष्य केल्याचे या निवेदनात म्हटले आहे. मात्र, या निवेदनाची स्वतंत्ररीत्या खातरजमा करता आलेली नाही. दुसरा हल्ला पूर्व बगदादमध्ये घडविण्यात आला. त्यात पाच जण ठार व १६ जण जखमी झाले. या हल्ल्याची जबाबदारी कोणत्याही गटाने घेतलेली नाही.
>कारबॉम्बचा हल्ला प्रत्यक्ष बघणाऱ्याने सांगितले की
स्फोटामुळे जवळपासच्या कपड्यांच्या व मोबाईल फोन दुकानांना आग लागली. बॉम्बहल्ले झाल्यानंतर कित्येक तासांनी इराकचे पंतप्रधान हैदर अल अबादी यांनी घटनास्थळाला भेट दिली.सोशल मीडियावर अपलोड करण्यात आलेल्या व्हिडिओ फुटेजमध्ये संतप्त लोक अबादी यांना ‘चोर’ म्हणताना दिसत होते. इस्लामिक स्टेटच्या तावडीतून फलुजा शहर मुक्त करण्यात आल्याची घोषणा इराकच्या सैन्याने केल्यानंतर अवघ्या आठवड्यात हा हल्ला झाला. गेल्या वर्षभरात इराकच्या सैन्याने आयएसच्या ताब्यातून बऱ्यापैकी भूभाग पुन्हा मिळवला आहे. त्यात बगदादच्या पश्चिमकडील विस्तीर्ण प्रांत अनबरमधील रामादी, हित आणि रुतबा ही शहरे पुन्हा ताब्यात घेतली आहेत.सरकारने भूभाग, काही शहरे आयएसकडून पुन्हा मिळविली असली तरी आयएसने आपण जोरदार हल्ले करण्याची कुवत राखून असल्याचेच सिद्ध केले आहे.
>अनेक इमारती आगीत खाक
स्फोटानंतर जवळपासच्या अनेक दुकानांना एकाचवेळी आग लागली. त्यामुळे संपूर्ण परिसरात हाहाकार माजला होता.
इमारतींना लागलेली आग विवझवण्यात आल्यानंतर जळून पडलेल्या मृतदेहांचा खच दिसत होता.
ऐन सायंकाळी गर्दीच्या वेळी स्फोट झाल्याने मृतांची संख्या वाढली असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.