पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्नाची मूर्ती बॉम्बनं उडवली; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 01:21 PM2021-09-27T13:21:36+5:302021-09-27T13:24:49+5:30

पाकिस्तान वृत्तपत्र डॉनच्या रिपोर्टनुसार, या वर्षीच्या सुरुवातीला मरिन ड्राइव्ह परिसरात मोहम्मद अली जिन्नाची मूर्ती उभारली होती

Baloch Libe­ration Front Destroyed Mohammad Ali Jinnah Statue In Bomb Attack In Gwadar Pakistan | पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्नाची मूर्ती बॉम्बनं उडवली; नेमकं काय घडलं?

पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्नाची मूर्ती बॉम्बनं उडवली; नेमकं काय घडलं?

googlenewsNext
ठळक मुद्दे काही बंडखोरांनी जिन्नांच्या मूर्तीखाली बॉम्ब लावला आणि त्याला उडवून टाकलंबलूच बंडखोर बलूचिस्तानमध्ये चिनी योजनांना विरोध करत आहे. त्यामुळे पाकिस्तानी सुरक्षा दल आणि चीनच्या नागरिकांना ते टार्गेट करत आहेत. मागील काही दशकात बलूचिस्तानात बलूच बंडखोर अधिक सक्रीय झाले आहेत.

ग्वादर – इमरान खान सरकारशी संघर्ष करणाऱ्या बलुच बंडखोरांनी रविवारी पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्नाची मूर्ती उद्ध्वस्त केली आहे. पाकिस्तानच्या ग्वादर शहरात हा हल्ला झाला. ज्याठिकाणी चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडोरसाठी अब्जाधीशाची गुंतवणूक करत आहे. या हल्ल्याची जबाबदारी बलूच लिबरेशन फ्रंटने या बॉम्ब हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.

पाकिस्तान वृत्तपत्र डॉनच्या रिपोर्टनुसार, या वर्षीच्या सुरुवातीला मरिन ड्राइव्ह परिसरात मोहम्मद अली जिन्नाची मूर्ती उभारली होती. हा परिसर अत्यंत सुरक्षित मानला जातो. सूत्रांनी सांगितल्याप्रमाणे, काही बंडखोरांनी जिन्नांच्या मूर्तीखाली बॉम्ब लावला आणि त्याला उडवून टाकलं. हा बॉम्ब इतका शक्तिशाली होता की, जिन्नाची मूर्ती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. हा बॉम्ब कुठल्या प्रकारचा होता याबाबत अद्याप काही माहिती समोर आली नाही.

बलूच बंडखोरांनी पाकिस्तानी सैन्याचं वाहन उडवलं

पाकिस्तानी सुरक्षा दल जिन्नाची मूर्ती नष्ट करणाऱ्यांचा शोध घेतला जात आहे. यापूर्वी बलूचच्या बंडखोरांनी केलेल्या बॉम्ब हल्ल्यात पाकिस्तानी सैन्याचं एक वाहन उडवलं. यात ४ सुरक्षा जवान मारले गेले तर २ जण जखमी झाले. हा हल्ला शनिवारी हारनाई जिल्ह्यात झाला. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानातील बलूचिस्तान लिबरेशन आर्मीने घेतली. पाकिस्तान सुरक्षाजवानांच्या वाहनावर सफर बाश परिसरात निशाणा बनवला. हे जवान गस्त घालण्यासाठी निघाले होते. तेव्हा आयईडीचा स्फोट झाला त्यात ४ सैनिकांचा मृत्यू झाला. यातील जखमी सुरक्षा रक्षकांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. मृत्यू झालेल्या सैनिकांत कॅप्टन आणि लेफ्टिनंटचा सहभाग आहे.

बलूच बंडखोरांचा चिनी योजनांना कडाडून विरोध

बलूच बंडखोर बलूचिस्तानमध्ये चिनी योजनांना विरोध करत आहे. त्यामुळे पाकिस्तानी सुरक्षा दल आणि चीनच्या नागरिकांना ते टार्गेट करत आहेत. एशिया टाइम्सच्या रिपोर्टनुसार, एकूण जमीन पाहिली तर बलूचिस्तान सर्वात मोठा प्रांत आहे. पाकिस्तानच्या एकूण लोकसंख्येत एकूण ९ टक्के बलूच लोकसंख्या आहे. मागील काही दशकात बलूचिस्तानात बलूच बंडखोर अधिक सक्रीय झाले आहेत. पाकिस्तानच्या राजकीय आणि सत्ता काबीज करण्यासाठी पंजाबींसोबतही बलूचचा संघर्ष होत आहे.

Web Title: Baloch Libe­ration Front Destroyed Mohammad Ali Jinnah Statue In Bomb Attack In Gwadar Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.