Baltimore Bridge Collapse : अमेरिकन सरकारने भारतीय क्रू मेंबरांचे केले कौतुक; कारण जाणून तुम्हीही सलाम कराल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 01:54 PM2024-03-27T13:54:22+5:302024-03-27T13:54:38+5:30
काल अमेरिकेतील बाल्टिमोरमधील फ्रन्सिस स्कॉट ब्रिज कोसळला. या पूलाला एका मोठ्या जहाजाने धडक दिली. यामुळे पूल कोसळला. या घटनेचा व्हिडीओ जगभरात व्हायरल झाला.
मेरीलँडमधील पॅटापस्कॉट नदीवरील फ्रान्सिस की ब्रिज अपघातामुळे अनेक वाहने पुलावर पडली. मंगळवारी पहाटे दीडच्या सुमारास ही घटना घडली. घडलेल्या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर दोघांनाही एकमेकांना वाचवण्याची ख्याती मिळाली. बेपत्ता लोकांवर संशोधन सुरू केले. किंवा मेरीलँडचे गव्हर्नर वेस मूर यांनी अपघातानंतर आणीबाणी घोषित केली. हे मालवाहू जहाज सिंगापूर येथील होते, या जहाजेवर असणारे सर्व क्रू मेंबर्स भारतीय होते, या क्रु मेंबरांचे अमेरिकन सरकारने कौतुक केलं आहे.
सैनिकांचा ‘अपमान’, नोबेल विजेतेही अटकेत!
या जहाजावर काम करणारे सर्व क्रु मेंबर्स भारतीय आहेत. या क्रू मेंबर्सचे आता अमेरिकेत कौतुक होते आहे. जहाजावर काम करणाऱ्या भारतीय क्रू मेंबर्संनी वेळेवर आम्हाला अलर्ट दिला नसता तर आज मोठी दुर्घंटना झाली असती असं अमेरिकन सरकारने म्हटले आहे.
सिंगापूर मालवाहू जहाजाच्या भारतीय क्रू मेंबर्सच्या कामाचे कौतुक करताना मेरीलँडचे गव्हर्नर वेस मूर म्हणाले, 'बाल्टीमोरमधील पुलावर जहाज धडक देण्यापूर्वीच भारतीय क्रू मेंबरांनी लगेच इशारा दिला होता. त्यामुळे आम्ही तातडीने पावले उचलली आणि अनेकांचा जीव वाचवण्यात यश मिळालं.’ सिंगापूरचं मालवाहू जहाज बाल्टिमोरमध्ये पुलाच्या पिलरला धडकण्यापूर्वीच पायलट आणि इतर क्रू मेंबर च्या मालवाहू जहाजाने इशारा दिला होता. त्यामुळे पुलावरील वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली होती.
या जहाजावरती सिंगापूरचा ध्वज होता, या जहाजाने बाल्टिमोरमधील धडक दिली. या अपघाताचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.जहाजामधील क्रू मेंबरस्ंना कोणतीही इजा झालेली नाही. ते सर्व सुरक्षित आहेत.जहाजमधीलक्रू मेंबर्संनी जहाज पुलावर आदळू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले.