हाफिज सईदच्या वृत्तांकनांवर बंदी
By admin | Published: November 3, 2015 12:08 PM2015-11-03T12:08:42+5:302015-11-03T12:12:21+5:30
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदच्या जमात उद दावाच्या वृत्तांकनावर बंदी घालण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला आहे.
ऑनलाइन लोकमत
कराची, दि. ३ - मुंबईतील २६/११ हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदच्या जमात उद दावाच्या वृत्तांकनावर बंदी घालण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला आहे. जमात उद दावाचे लष्कर ए तोयबासोबतच्या संबंधांची पहिल्यांदाच कबुली देत पाकिस्तानने हा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तानने संयुक्त राष्ट्राने जाहीर केलेल्या लष्कर ए तोयबा व अन्य दहशतवादी संघटनांवर कारवाईचे आश्वासन दिले होते. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या गृहमंत्रालयाने जमात उद दावा व लष्करच्या संबंधांची कबुली देत त्यांच्या वृत्ताकनांवर बंदी घातली आहे. पाकिस्तानमधील इलेक्ट्रॉनिक मिडीया ऑथोरिटीने या संदर्भात एक परिपत्रक काढून जमात उद दावाच्या कार्यक्रमाचे वृत्तांकन करण्याच बंदी असल्याची स्पष्ट केले आहे.