लहान मुलांच्या व्हिडिओ गेमिंग्जवर निर्बंध, 'या' सरकारचं कौतुकास्पद धोरण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 09:06 PM2021-08-30T21:06:11+5:302021-08-30T21:07:38+5:30

चीनमधील लहान मुलांच्या जीवनावर व्हिडिओ गेमिंगचा होणार विपरीत परिमाण पाहता, कडक धोरण अवलंबण्याच्या तयारीत आहे. लहान मुलांमधील हे गेम्सचा व्यसन कमी करण्यासाठी या खेळावर बंदी आणण्याचा विचार चीनचं सरकार करत आहे.

Ban on video games for children, china government's laudable policy | लहान मुलांच्या व्हिडिओ गेमिंग्जवर निर्बंध, 'या' सरकारचं कौतुकास्पद धोरण

लहान मुलांच्या व्हिडिओ गेमिंग्जवर निर्बंध, 'या' सरकारचं कौतुकास्पद धोरण

Next
ठळक मुद्देचीनमधील या नियमांची अंमलबजावणी करताना सहसा गेम कंपन्यां रिअल-नेम/आयडी खात्यांशी संलग्न असते. चीनमध्ये काम करताना कंपन्यांना या नियमांचे पालन करण्यास भाग पाडले जाते.

नवी दिल्ली - इंटरनेच्या डिजिटल युगात लहान मुलं अतिशय सक्रीय झाली आहे. त्यातच मोबाईल हे जणू त्यांच्या वापराचं अपर्यायी साधनच बनल्याचं दिसून येत आहे. कोविड काळात एज्युकेशन फ्रॉम होम या संकल्पनेमुळे मोबाईल हा नित्याचा बनला असून गरीबातील गरीब विद्यार्थ्यांसाठीही काळाची गरज बनला आहे. मात्र, अभ्यासापेक्षा इतर गोष्टीवर, सर्चिंगवरच विद्यार्थ्यांचा मोठा भर दिसून येतो. त्यातही व्हिडिओ गेमींगची क्रेझही वाढली आहे. त्यामुळे, चीन आता व्हिडिओ गेमिंगवर बंधन घालण्याच्या विचारात आहे. 

चीनमधील लहान मुलांच्या जीवनावर व्हिडिओ गेमिंगचा होणार विपरीत परिमाण पाहता, कडक धोरण अवलंबण्याच्या तयारीत आहे. लहान मुलांमधील हे गेम्सचा व्यसन कमी करण्यासाठी या खेळावर बंदी आणण्याचा विचार चीनचं सरकार करत आहे. चीनमध्ये अगोदरपासूनच लहान मुलांना व्हिडिओ गेमिंगसाठी ठराविक कालमर्यादा आहे. चीनमध्ये 18 वर्षाखालील मुलांना केवळ 1.5 तास व्हिडिओ गेम खेळण्याची परवानगी आहे. आता, नव्या नियमानुसार दिवसाला फक्त 1 तास यानुसार आठवड्यात फक्त तीनच दिवस परवानगी देण्यात येणार आहे. शुक्रवार, शनिवार आणि रविवार या तीन दिवसांतच व्हिडिओ गेम खेळण्याची परवानगी असणार आहे. 

चीनमधील या नियमांची अंमलबजावणी करताना सहसा गेम कंपन्यां रिअल-नेम/आयडी खात्यांशी संलग्न असते. चीनमध्ये काम करताना कंपन्यांना या नियमांचे पालन करण्यास भाग पाडले जाते. त्यानुसार, ठराविक तासाची मुदत संपल्यानंतर तुम्हाला गेममधून बाहेर काढले जाऊ शकते आणि तुम्हाला पुढे खेळण्याची परवानगी दिली जाणार नाही. विशेष म्हणजे तीन आठवड्याच्या दिवसात रात्री 8-9 दरम्यानच हे गेमिंग्ज खुले ठेवता येते. दरम्यान, चीनध्ये अंदाजे 110 दशलक्ष अल्पवयीन मुले गेमिंग्ज अॅप वापरतात. 
 

Web Title: Ban on video games for children, china government's laudable policy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.